Breking News
Wagholi Accident Pune : पुण्यात वाघोलीत भीषण अपघात; मोटार दुभाजकाला धडकलीIllegal Tobacco Factory Pune : प्रतिबंधित तंबाखूचा कारखाना उध्वस्त, ११ लाखांचा माल जप्तMarathi Book Publication Pune : स्थितप्रज्ञ राहून समाजप्रबोधनासाठी साहित्यनिर्मिती- प्रा. डॉ. राजाभाऊ भैलुमेHarshada Farande BJP Appointment : हर्षदा फरांदे यांची भाजप ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्तीPune Crime News : बिबवेवाडीत गावठी दारू विक्री करणारा अटकेतPune Jewellery Theft : लक्ष्मी रस्त्यावरील सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cyber Fraud News : पेन्शन कार्डच्या आमिषाने डाॅक्टरांची १० लाखांची फसवणूकPulse Polio Campaign Pune : उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम;“दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी”Sunetra Ajit Pawar Sports News : आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेतून महाराष्ट्राच्या खेळाडूंना जागतिक संधी- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारOnline Task Fraud Pune : ऑनलाइन टास्कचे आमिष दाखवून महिलेची ५ लाखांची फसवणूक 

शीतल तेजवाणीची सलग ६ तास चौकशी

पोलिसांनी शीतल तेजवाणीचा जबाब नोंदवला

मुंढव्यातील कथित जमीन घोटाळा प्रकरण

marathinews24.com

पुणे – शहरातील मुंढव्यातील कथित जमीन घोटाळा प्रकरणातील शीतल तेजवाणी हिची पुणे पोलिसांनी गुरुवारी ( दि.२०) सलग ६ तास चौकशी केली. तेजवाणीने महार वतनाच्या व्यक्तींकडून पॉवर ऑफ आटर्नि करून घेतलेले कागदपत्रे तसेच अमेडिया कंपनीसोबत केलेल्या व्यवहाराच्या अनुषंगाने ही चौकशी करण्यात आली. चौकशीसाठी पुन्हा शीतल तेजवाणीला बोलविण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अवैध मद्यवाहतूक, विक्री व बनावट मद्यनिर्मितीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई – सविस्तर बातमी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार संचालक असलेल्या अमेडिया कंपनीवर बोपोडी व मुंढवा अशा दोन जमीन प्रकरणात पुण्यातील खडक पोलिस ठाण्यात एक गुन्हा नोंद झाला. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. दरम्यान, बोपोडी जमीन प्रकरणात अमेडिया कंपनीचे संचालक दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवाणी यांचा संबंध नसल्याचे देखील पोलिसांनी नंतर स्पष्ट केले होते.

मुंढवा जमीन प्रकरणात महार वतनाची आहे. परंतु, २००६ मध्ये शीतल तेजवाणी हिने २७५ व्यक्तींकडून ही जमीन पॉवर ऑफ अटर्नी करून घेतली. नंतर २०२५ मध्ये ही जमीन शीतल तेजवाणी हिने अमेडिया कंपनीसोबत करार करून ती जमीन त्यांना दिली. या जमीन प्रकरणात जूनमध्ये ताबा घेण्याचा देखील प्रयत्न झाला होता.

पुणे पोलिस आता नेमका व्यवहार काय झाला या अनुषंगाने तपास करत आहे. सुर्यकांत येवले, दिग्विजय पाटील, शीतल तेजवाणी आणि हेमंत गवंडे यांना नोटीस देऊन चौकशीला बोलावले होते, हेमंत गवंडे चौकशी झाली. आता बुधवारपासून शीतल तेजवाणीची पोलिसांकडे चौकशी सुरू आहे. गुरूवारी पोलिसांनी सलग ६ तास शीतल तेजवाणीकडे चौकशी केली.चौकशीत पोलिसांनी नेमक संबंधित व्यक्तींकडून पॉवर ऑफ अॅटर्नीकरून घेताना त्यांना काय मोबदला दिला का, कशाच्या आधारावर पॉवर ऑफ अॅटर्नी केली, अमेडिया कंपनीसोबत झालेला व्यवहार कशा पद्धतीने झाला, याअनुषंगाने ही चौकशी झाली तसेच सर्व कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. त्यादृष्टीने पोलिस तपास करत आहेत.

संबंधित व्यक्तींना जबाबासाठी बोलावले

शीतल तेजवाणी हिला तब्बल २७५ व्यक्तींनी पॉवर ऑफ अटर्नी दिली आहे. काही चार व्यक्तीमध्ये एकत्रित कागदपत्रे केली आहेत, तर काहींची वैयक्तिक देखील आहेत. त्यानुसार पोलिसांनी त्या सर्व व्यक्तींनाही शुक्रवारी पोलिसांनी जबाब नोंदविण्यासाठी बोलावले आहे. त्यांच्या जबाबानंतर अनेक गोष्टींचा उलघडा होईल असे पोलिस सांगत आहेत. नेमका या व्यक्तींना मोबदला काय भेटला, हे अद्याप समोर आले नाही.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×