Breking News
ड्रग्स प्रकरणातील फरार आरोपीकडून गोळीबार; दोघे जखमीकेंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते लिंगभाव समावेशनावरील आशियातील पहिल्या युनेस्को अध्यासनाचे उद्घाटनमराठा लाइट इन्फंट्रीच्या १६ भैरव बटालियनला दगडूशेठ गणपतीची पंचधातूची मूर्ती सुपूर्दपुण्यातील व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे दोघे संचालक फरारपुण्यात भूजल सर्वेक्षण विभागातील दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडलेबेलसर टोलनाक्यावर स्थानिकांना टोलमाफी मिळावीजिल्हाधिकारी यांच्याकडून आषाढी वारीसाठी पालखी मार्गावरील सोयीसुविधांचा आढावाजिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्नअल्पवयीनांमधील व्यसनाधिनता रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हानपालघर अनधिकृत फटाका कारखाना स्फोट प्रकरण

घातपाताच्या तयारीतील सराईताला अटक, पिस्तूल जप्त

भारती विद्यापीठ पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

पुणे – घातपाताच्या तयारीत असलेल्या सराईताला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ५० हजार रूपये किंमतीचा गावठी कट्टा, जिवंत काडतुस असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. लक्ष्मण दगडू कचरे (वय २२, रा. कात्रज ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याच्याविरूद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात वीजेच्या धक्क्याने कारगिराचा मृत्यू – सविस्तर बातमी

भारती विद्यापीठचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक २३ मार्चला हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अमलदार मीतेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी यांना कात्रजमधील गंधर्व लान्सजवळ एकजण अग्निशस्त्र बाळगून थांबल्याची माहिती मिळाली. पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी यांच्यासह पथकाने धाव घेत आरोपी लक्ष्मण कचरे याला ताब्यात घेत गावठी कट्टा, काडतुस असा शस्त्रसाठा जप्त केला. ही कामगिरी उपायुक्त मिलींद मोहिते, एसीपी राहुल आवारे, वरिष्ठ निरीक्षक राहूल खिलारे, सचिन सरपाले, मंगेश पवार, नीलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×