Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

मित्राला व्हिडीओ पाठवत तरूणाची आत्‍महत्‍या

मोटारीच्या दरवाज्यावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू

सासरच्‍या त्रासाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल

marathinews24.com

पुणे – पती-पत्‍नीच्‍या भांडणातून व सासरच्‍या त्रासाला कंटाळून तरूणाने आत्‍महत्‍येपूर्वी व्हिडीओ तयार केला. त्‍यानंतर तो व्हिडीओ गावाकडील मित्राला पाठवल्‍यानंतर त्‍याने उंदीर मारण्याचे औषध प्राषण करून आत्‍महत्‍या केल्‍याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. मोहम्‍मद साद आसीफ सय्यद (वय २० सध्या रा. जांभुळवाडी, मुळ रा. नयापुरा मालेगाव, नाशिक) असे आत्‍महत्‍या केलेल्‍या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी करीमुन्निशा उर्फ निशाखान (वय २०, रा. सप्तगिरी सोसायटी, रवी कोळी, जांभुळवाडी), सर्वर उर्फ कैफकमरू खान (वय २२ रा. संतोषनगर, कात्रज), रेश्मा कमरूखान (वय ५०), शमा जावेद शेख, जावेद शेख (वय २५), अथर्व काळे आणि इशीता यांच्‍यावर गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

कोथरुड आणि कोंढवा परिसरात घरफोडी – सविस्तर बातमी

पोलिस उपनिरीक्षक मारूती वाघमारे यांनी सांगितले, मोहम्मद साद हा मुळचा मालेगाव येथील राहणारा असून त्‍याचा एक वर्षापूर्वी पुण्यातील तरूणीबारोबर मुस्‍लीम पध्दतीने विवाह झाला होता. लग्नानंतर तो पुण्यात जांभुळवाडी परिसरात राहत होता. तसेच रिक्षा चालवून आपल्‍या घरातील उदरनिर्वाह चालवत होता. परंतु, किरकोळ कारणावरून पती पत्‍नीमध्ये खटके उडत होते. यातून सासरच्‍यांकडून त्रास होत होता. परंतु, वारंवार होणारा माणसीक त्रास सहन न झाल्‍याने मोहम्‍मद साद याने त्‍याच्‍या मोबाईलवर एक व्हिडीओ तयार करून त्‍या व्हिडीओत आपण सासर व इतरांच्‍या त्रासाला कंटाळून आत्‍महत्‍या करत असल्‍याचे म्‍हटले. त्‍यानंतर तो व्हिडीओ त्‍याने आपल्‍या गावाकडील एका मित्राला पाठविला. त्‍यानंतर त्‍याने दि. 7 मार्च रोजी कात्रज येथील संतोषनगर मधील डिलाईट बेकरी समोर रिक्षा पार्क करून उंदीर मारण्याचे औषध प्राषण करून आत्‍महत्‍या करण्याचा प्रयत्‍न केला. दि. 12 मार्च रोजी उपचारा दरम्‍यान त्‍याचा मृत्‍यू झाला. दरम्‍यान मोहम्‍मद साद याचा गावाकडील मित्र याने हा व्हिडीओ त्‍याया घरच्‍यांना दाखविला. त्‍यानंतर मोहम्‍मद साद याची आई नौशा दतन्वीर अहमद (41, रा. नयापुरा, मालेगाव, नाशिक) यांनी आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पुढील तपास आंबेगाव पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक मारूती वाघमारे करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×