बाजीराव रस्त्यावर सीनियर सिटीझनचा मोबाइल चोरट्याने हिसकावला
marathinews24.com
पुणे – शहरातील मध्यवर्ती बाजीराव रस्त्यावर सायकलस्वार ज्येष्ठाच्या खिशातील मोबाइल चोरट्यांनी चोरुन नेला. याप्रकरणी ज्येष्ठ नागरिकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ नागरिक तावरे कॉलनीत राहायला आहेत. त्यांचा मुलगा मध्य भागात राहायला असून, रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ते सायकलवरुन बाजीराव रस्त्याने निघाले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या खिशातील मोबाइल चोरुन नेला. पोलीस हवालदार नलावडे तपास करत आहेत.
रिक्षातून प्रतिबंधित गुटख्याची विक्री, दोघांविरुद्ध कोथरूड पोलिसांनी केली कारवाई – सविस्तर बातमी
हडपसर भागात पादचार्याशी झटापट करुन चोरट्यांनी मोबाइल चोरुन नेल्याची घटना घडली. याप्रकरणी विजय खंडू सरोदे (वय १९, रा. फुरसुंगी, हडपसर) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीनाला पोलिसांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत सूरज रामनिहलानी यादव (वय ४१, रा. राजगे आळी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार कांबळे तपास करत आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपासून दुचाकीस्वार चोरट्यांनी आता मोबाइल हिसकावण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे पादचार्यांमध्ये प्रचंड धास्ती निर्माण झाली आहे.
गुलटेकडीत व्यावसायिकाची मोटार चोरीला
व्यावसायिकाने रस्त्याच्या कडेला लावलेली मोटार चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना गुलटेकडी परिसरात घडली. याप्रकरणी कमलेशकुमार कांतीलाल शहा (वय ३६, रा. गणेश पॅलेस सोसायटी, गुलटेकडी, क्रिसेंट हायस्कूलजवळ) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शहा यांनी सोसायटीसमोर मोटार लावली होती. त्यानंतर चोरट्यांनी मोटार चोरुन नेली. चोरलेल्या मोटारीची किंमत साडेपाच लाख रुपये आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. सहायक फौजदार गुरव तपास करत आहेत.