निवासी शाळांमध्ये प्रवेशासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना आवाहन
marathinews24.com
पुणे – जिल्ह्यात अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा दिवे ता. पुरंदर, तरंगवाडी ता. इंदापूर, पेठ ता. आंबेगाव तसेच मुलींची शासकीय निवासी शाळा चांडोली ता. खेड येथे २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित शाळा ६ वी ते १० वीपर्यंत कार्यरत आहेत. निवासी शाळांमध्ये अनुसूचित जातींसाठी ८० टक्के, अनुसूचित जमाती १० टक्के, विमुक्त जमाती व भटक्या जमाती- ५ टक्के, विशेष मागास प्रवर्ग- २ टक्के अणि दिव्यांगांसाठी ३ टक्के जागा आरक्षित आहेत.
प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना निवासी शाळांमध्ये ई-लर्निंग अध्यापन सुविधा, अनुभवी व तज्ज्ञ शिक्षक, सेमी इंग्रजी व मराठी माध्यम अशा दोन्ही माध्यमामध्ये विद्यार्थ्यांना शिकविले जाते, तसेच मोफत भोजन व निवासाची सोय, स्वच्छ वातावरण व ३ मजली इमारत, विविध खेळ व स्पर्धा मार्गदर्शन, स्वतंत्र भव्य क्रीडांगण, स्वतंत्र प्रयोगशाळा व ग्रंथालय, २४ तास वीज व पाणी सुविधा, ३ हजार पुस्तकांचे भव्य ग्रंथालय व वाचनालय, दरवर्षी स्नेहसंमेलन, क्रीडा स्पर्धा व सहलीचे आयोजन, ई लायब्ररी व विज्ञान केंद्र, डिजीटल क्लासरुम आदी मोफत सोयीसुविधा शासनामार्फत देण्यात येतात, असे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी सांगितले आहे.