मोबाईलसह, दुचाकी जप्त
marathinews24.com
पुणे – पिण्याच्या पाण्याची मागणी करीत पादचार्याकडून मोबाइल हिसकावून पसार झालेल्या दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या अल्पवयीन साथीदारालाा ताब्यात घेण्यात आले आहे. टोळीकडून मोबाइल, रोकड, दोन दुचाकी असा ८१ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. मयुर उर्फ बाबु संजय गिरी, (वय १९ रा. वडारवाडी) सुजल राजेश अलकुंटे (वय १८, रा. वडारवाडी पुणे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अमित कुमार गौतम (वय २२) याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
चोरीच्या मोबाईलद्वारे १० लाख रुपयांची खंडणी मागणार्याला बेड्या – सविस्तर बातमी
तक्रारदार अमित हा २० एप्रिलला हॉटेलमधील साफ सफाईचे काम उरल्यानंतर शिवाजीनगर गावठाणातुन पायी जात होता. रोकडोबा मंदिराच्या जवळ चौघांनी त्याला थांबवून पिण्याचे पाणी मागण्याचा बहाणा करीत मोबाइल, रोकड हिसकावून नेली. गुन्ह्यातील आरोपींचा उपनिरीक्षक प्रमोद पाटील, हवालदार संतोष मेमाणे, सचीन जाधव, रोहीत झांबरे शोध घेत होते. त्यावेळी संतोष मेमाणे आणि सचिन जाधव यांना आरोपी हा मॉडेल कॉलनीतील दीपबंगला चौकात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून अजय सुभाष मुथराज (वय १९ रा. जयभवानी नगर, कोथरुड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे मोबाइल, रोकड मिळून आली.
चौकशीमध्ये त्याने अल्पवयीन साथीदारासह मयुर उर्फ बाबु संजय गिरी, सुजल राजेश अलकुंटे यांच्या मदतीने गुन्ह्या केल्याची कबुली दिली. पोलीस शिपाई रोहीत झांबरे यांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मयुर उर्फ बाबु संजय गिरी आणि सुजल राजेश अलकुंटे यांना वडारवाडीतून ताब्यात घेत अटक केली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त संदिपसिंह गिल, एसीपी साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) चंद्रकांत सुर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील, हवालदार संतोष मेमाणे, हवालदार सचीन जाधव, प्रमोद मोहिते, महावीर वलटे, रोहीत झांबरे यांनी केली.