Breking News
हडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापरपुण्यात दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरफार; २७४ दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई

थेट न्यायालयातील स्क्रीन समोर उडवली कॉलर

दिवंगत देशमुख हत्येतील आरोपींची मुजोरी थांबता थांबेना

marathinews24.com

बीड : (अनंत जाधव) – मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या बहू चर्चेत असलेल्या खून प्रकरणाची दि. २१ मे रोजी बीड विशेष मकोका न्यायलयात सुनावणी पार पडली . पुढील सुनावणी आता ४ जूनला होणार आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींची माज अजूनही कमी झाला पाहायला मिळत नाही. आरोपींनी गुरुवारी कोर्टात केलेल्या मुजोरीची चर्चा जिल्हाभरात सुरू आहे. कायद्याचा कोणताही धाक नसलेले वर्तन सुनावणी दरम्यान कोर्टासमोर आले. दरम्यान, गुरुवारी झालेल्या सुनावणीत आरोपींच्या उद्धट वर्तनाने कोर्टाच्या आवारात देशमुख कुटुंब आणि गावकऱ्याकडून तीव्र संताप व्यक्त केला आहे.

पुणे पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह – सविस्तर बातमी

खटल्याच्या कामकाजादरम्यान आरोपी जयराम चाटे याने दाखल केलेल्या जामीन अर्जावर गुरुवारी सरकारी पक्षाच्यावतीने न्यायालयात म्हणणे मांडले. दुसरीकडे, आरोपीच्या वकिलांनी न्यायालयीन प्रक्रियेत पुन्हा एकदा लॅपटॉप चा जुनाच मुद्दा पुढे करत वेळकाढूपणा करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. या संदर्भात माहिती देताना सरकारी पक्षाचे वकील ॲड . बाळासाहेब कोल्हे यांनी सांगितले की, आरोपी विष्णू चाटे याच्याकडून न्यायालयात अर्ज सादर करण्यात येणार असल्याचे त्यांच्या वकिलांकडून सांगण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात अद्यापपर्यंत न्यायालयात कुठलाही अधिकृत अर्ज सादर करण्यात आलेला नाही.

काय म्हणाले धनंजय देशमुख

धक्कादायक प्रकारावर प्रतिक्रिया देताना हत्या झालेले सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख म्हणाले, नराधम आरोपींना त्यांच्या कृत्याचा कसलाही पश्चाताप नाही. त्यांची आजची उद्धट वागणूक सन्माननीय न्यायाधीश साहेबांनी आणि आम्ही सर्वांनी स्वतः पाहिली आहे. हे आरोपी किती निर्वावलेले आहेत, हे सिद्ध करण्यासाठी न्यायाधीशांनी या गोष्टी अधिकृतपणे चार्जशीट आणि कोर्टाच्या रेकॉर्डवर नमूद कराव्यात, अशी आमची विनंती आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×