Breking News
हडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्नजणगणना करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंगहसण्यातूनच वाढेल माणसाचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ – मकरंद टिल्लूतपास होणार नसेल तर कार्यालयाला कुलूप लावा -आमदार रोहित पवार

नीट पेपर लीक प्रकरणात ११ वी अटक

पुण्यातून मनीषा हवालदारला सीबीआयच्या बेड्या

marathinews24.com

पुणे – देशभर गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. नीट पेपर लीक प्रकरणात आणखी एका मास्टरमाईंड महिलेला पुण्यातून अटक करण्यात आली. फिजिक्स म्हणजेच भौतिकशास्त्राचे प्रश्न लीक करणाऱ्या मनीषा संजय हवालदार नावाच्या महिलेला अटक करण्यात आली आहे. मनीषाने हवालदार या महिलेने नीट परीक्षेतील भौतिकशास्त्राचे प्रश्न लीक केले होते.

७२ कोटीचा भूसंपादन भ्रष्टाचार घोटाळा पाठकांच्या आला अंगलट – सविस्तर बातमी

तिच्याकडे सखोल चौकशी सुरू असून काही नावे समोर येण्याची शक्यता आहे. याप्रकरणी ही ११ वी अटक सीबीआयने केली आहे. मनीषा हवालदार सध्या पुण्यातील सेठ हिरालाल सराफ प्रशाला येथे कार्यरत होती. एनटीएने तिला पेपर प्रक्रियेसाठी तज्ज्ञ म्हणून नियुक्त केले होते. ती भौतिकशास्त्राच्या प्रश्नपत्रिकांपर्यंत पोहोचू शकत होती. यापूर्वी अटक झालेल्या मनीषा मांढरेसोबत मिळून तिने भौतिकशास्त्राचे काही प्रश्न लीक केले होते. हे सर्व प्रश्न तपासण्यात आले आणि हेच लीक झालेले प्रश्न नीटच्या पेपरमध्ये आल्याचे आढळले.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून ३ मे रोजी नी नीट परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर आल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली असून आता परीक्षा २१ जून रोजी होणार आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास सीबीआयकडून करण्यात येत आहे. या प्रकरणात सीबीआयने देशभरातील विविध ठिकाणी छापेमारी केली असून अनेक महत्त्वाची कागदपत्रे, लॅपटॉप, बँक स्टेटमेंट्स आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. जप्त साहित्याचे सविस्तर विश्लेषण सुरू आहे. तपासात प्रश्नपत्रिका लीक होण्याचा मूळ स्रोत समोर आला असून, लाखो रुपये घेऊन विद्यार्थ्यांना विशेष कोचिंग क्लासेसमध्ये प्रश्न पुरवणाऱ्या दलालांनाही ओळखून अटक करण्यात आली आहे.

आतापर्यंत ११ जणांना अटक

सीबीआयने महाराष्ट्रातून यापूर्वी शिवराज मोटेगावकर, पी. व्ही. कुलकर्णी, मनीषा मांढरे, मनीषा वाघमारे, शुभम खैरनार, धनंजय लोखंडे यांच्यासह दुसऱ्या राज्यातून दिनेश बिवाल, मांगीलाल बिवाल, विकास बिवाल आणि यश यादव यांना अटक केली होती. आता यामध्ये मनिषा हवालदार या ११ व्या आरोपीचा समावेश झाला आहे.

मनिषा हवालदारचे निलंबन

मनिषा हवालदार हिला सीबीआयकडून अटक होताच, विद्या प्रसारिणी सभेच्या शेठ हिरालाल सराफ प्रशालेकडून तिला निलंबित करण्याचे आल्याचे पत्रक काढण्यात आले. तसेच ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्थ असल्याचेही संस्थेच्यावतीने सांगण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×