Breking News
हडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्नजणगणना करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंगहसण्यातूनच वाढेल माणसाचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ – मकरंद टिल्लूतपास होणार नसेल तर कार्यालयाला कुलूप लावा -आमदार रोहित पवार

फ्लॅटमधून पाच लाखांचा ऐवज लांबविला

गंजपेठेत भरदिवसा घरफोडी, सव्वा लाखांचा ऐवज चोरीला

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील मुंढवा भागात एका सोसायटीत असलेल्या सदनिकेतून चोरट्यांनी रोकड, तसेच सोन्याचे दागिने असा पाच लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

केज तालुक्यात वादळीवाऱ्यासह पावसाचा हाहाकार, झाड कोसळून एकाचा मृत्यू – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण कुटुंबीयांसह मुंढव्यातील बाॅन विवांत सोसायटीत राहायला आहेत. सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याची संधी चोरट्याने साधली. शयनगृहातील कपाटातून चोरट्याने पाच हजारांची रोकड, तसेच सोन्याचे दागिने असा पाच लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. सदनिकेत चोरी करणारा चोरटा माहितगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण तपास करत आहेत.

वसतिगृहातून लॅपटाॅप चोरी

बालेवाडीतील एका खासगी वसतिगृहातून (पीजी) चोरट्यांनी २ लॅपटाॅप, मनगटी घड्याळ, मोबाइल संच असा मु्द्देमाल चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत एका तरुणाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण हा बालेवाडीतील झोलो पीजी या खासगी वसतिगृहात राहायला आहे. चोरट्यांनी वसतिगृहातून २ लॅपटाॅप, एक मनगटी घड्याळ, लॅपटाॅप बॅग, मोबाइल संच, पेनड्राईव्ह असा मुद्देमाल चोरुन नेला. पोलीस हवालदार निकाळजे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×