पुण्यात मालकाच्या ऐवजावर दरोडा, टोळक्याला अटक

पुण्यात मालकाच्या ऐवजावर दरोडा, टोळक्याला अटक

सहकारनगर पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – मालकाच्या डोळ्यात स्प्रे मारून तब्बल २५ लाखांवर ऐवज लुटणार्‍या कामगारासह टोळीला सहकारनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून दरोड्यातील बहुतांश ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही घटना २५ मे रोजी धनकवडीतील दुर्वाकुर कार्यालयाजवळ घडली होती. करण भगवान कोंढाळकर (वय १९ आंबेगाव पठार) यश भगवान कोंढाळकर ( वय २१ ) जुनेद जमिल शेख (वय १९ रा. कात्रज) ऋतुराज शिवाजी गोरे (वय २१ रा. आंबेगाव पठार) युवराज गणेश वैराट (वय २४ सहकारनगर, पद्मावती ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

अन्न व औषध प्रशासनाकडून आंबेगाव व खेड तालुक्यात ५ ठिकाणी धडक कारवाई – सविस्तर बातमी 

देशी-विदेशी चलन बदलण्याचा व्यावसायिक तक्रारदार हे २५ मे रोजी २५ लाख ९० हजारांची रोकड घेउन कार्यालयात जात होते. त्यावेळी टोळक्याने त्यांच्या डोळ्यात स्प्रे मारून रक्कम लुटल्याची घटना धनकवडी घडली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोहार, उपनिरीक्षक गणेश कर्चे यांच्या पथकाने तपासाला गती दिली. त्यावेळी पोलीस अंमलदार सुतकर, अतुल पवार व भगत यांना जबरी चोरी करणारा एकजण आंबेगाव पठार परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने धाव घेउन त्याला ताब्यात घेतले.

संबंधित अल्पवयीनाने साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपींमध्ये तक्रारदार यांच्याकडे काम करणारा युवराज वैराट असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने पाचही आरोपींना ताब्यात घेत अटक केली. ही कामगिरी अपर आयुक्त राजेंद्र बनसोडे, उपायुक्त मिलींद मोहीते, एसीपी धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार, पोलीस निरीक्षक संतोष जाधव, तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोहार, उपनिरीक्षक गणेश कर्चे, पोलीस अंमलदार शिवतरे, सुतकर, भगत, बागलाने, येणपुरे, अतुल पवार, नलवाड यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×