Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

सराइताचा गोळ्या झाडून सराइताचा खून

 सराइताचा गोळ्या झाडून सराइताचा खून

शिरुरमधील कर्डे घाटातील घटना

marathinews24.com

पुणे – वैमनस्यातून सराइतावर देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार करुन खून करण्यात आल्यचाी घटना सोमवारी सायंकाळी शिरुर-सातारा महामार्गावरील कर्डे घाटात सोमवारी संध्याकाळी साडे पाच वाजता घडली.विशाल सुनील काळेे (वय ३०, रा. ढोर आळी, शिरुर, जि. पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे.

पुण्यात मालकाच्या ऐवजावर दरोडा, टोळक्याला अटक – सविस्तर बातमी 

पोलिसंनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल काळे हा मित्रांसोबत मोटारीतून शिरुर-सातारा मार्गावरुन निघाला होता. कर्डे घाटात हल्लेखोरांनी मोटार अडवली. मोटारीतील काळे आणि त्याच्याबरोबर असलेले दोघे जण तेथून पळून जाण्याचा प्रयत्नात होते. त्यावेळी चार ते पाच हल्लेखोरांनी पाठलाग करुन काळे याला अडवले. त्याला माराहण करुन पिस्तुलातून गोळ्या झाडल्या, तसेच डोक्यात दगड घातला. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात काळे याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढाेले. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. विशाल काळे हा शिरुर परिसरातील एका खून प्रकरणात आरोपी होता. खून प्रकरणात त्याला न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला होता. काळे याच्या खून प्रकरणातील संशयितांची नावे निष्पन्न झाली असून, पोलिसांची पथके त्यांच्या मागावर आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×