Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

पिस्तूल बाळगणारे सराईत अटकेत

पिस्तूल बाळगणारे सराईत अटकेत

सराइतांना लक्ष्मीनगर पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

पुणे – पिस्तूल बाळगणाऱ्या सराइतांना लक्ष्मीनगर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल, तसेच काडतूस जप्त करण्यात आले. साजिद उर्फ डीजे मोहम्मद शेख (वय २०, रा. कामराजनगर, येरवडा), शुभम राजेंद्र बोत (वय २६, रा. ढवळे वस्ती, घोरपडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शेख आणि बोत हे सराईत आहेत. येरवडा पोलीस ठाण्यात शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.

सराइताचा गोळ्या झाडून सराइताचा खून – सविस्तर बातमी 

गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पसार झाला होता. शेख त्याच्या घरी येणार असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी अक्षय शिंदे, कादीर शेख, अमोल गायकवाड यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावला. पोलिसांना पाहताच शेख आणि त्याच्याबरोबर असलेला साथीदार बोत हे घराच्या खिडकीतून उतरुन पसार होण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी पाठलाग करुन दोघांना पकडले. पाेलिसांनी झडती घेतली. तेव्हा शेख याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस सापडले.

परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त रजनीकांत चिलुमुला, सहायक आयुक्त सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम, गुन्हे शाखेचे निरीक्षक उमेश गित्ते, सहायक निरीक्षक दत्तात्रय लिगाडे, रवीकांत नंदनवार, अमोल वायाळ, राहुल परदेशी, सूरज ओंबासे, अतुल जाधव, दत्तात्रय शिंदे, नितीन धायगुडे, सचिन कचेक यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×