फुलेप्रेमी कवीच्या कुटुंबाला तीन लाखांची आर्थिक मदत

फुलेप्रेमी कवीच्या कुटुंबाला तीन लाखांची आर्थिक मदत

आर्थिक संकटाच्या काळात फुलेप्रेमी कवी-कवयित्रींनी मदतीचा हात केला पुढे

marathinews24.com

पुणे – बुलढाणा जिल्ह्यातील केळवद येथील अल्पभूधारक शेतकरी, तसेच फुलेप्रेमी कवी शाहीर मनोहर पवार यांचा शेतातील आंब्याच्या झाडावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. ते देशातील पहिली मुलींची शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियान व आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलच्या फुलेप्रेमी परिवारातील सक्रिय सदस्य होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या आकस्मिक निधनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या काळात फुलेप्रेमी कवी-कवयित्रींनी मदतीचा हात पुढे केला.

विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडक – सविस्तर बातमी 

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या समतावादी विचारधारेवर श्रद्धा ठेवून सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत कार्य करणाऱ्या कवी-कवयित्रींना ‘फुलेप्रेमी कवी’ म्हणून ओळखले जाते. मनोहर पवार हे अशाच विचारांचे कार्यकर्ते व कवी होते. भिडेवाडाकार फुलेप्रेमी संविधान दूत कवी विजय वडवेराव यांनी मनोहर पवार यांच्या कुटुंबासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केल्यानंतर देशभरातील फुलेप्रेमी कवी-कवयित्रींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अवघ्या तीन दिवसांत तीन लाख रुपयांचा निधी जमा करण्यात आला.

पवार यांच्या दहाव्याच्या विधीच्या दिवशी केळवद येथे आयोजित कार्यक्रमात विजय वडवेराव यांनी समाजबांधवांच्या उपस्थितीत तीन लाख रुपयांचा धनादेश पवार यांच्या पत्नी आणि दोन्ही मुलींकडे सुपूर्द केला. या मदतीमुळे कुटुंबाला मोठा आर्थिक आधार मिळाला असून मुलींच्या शिक्षणासाठीही मदत होणार आहे. सहकारी कवीच्या निधनानंतर साहित्यिक आणि सामाजिक बांधिलकी जपत देशभरातील कवींनी एकत्र येऊन त्यांच्या कुटुंबासाठी तीन लाख रुपयांचा निधी उभारल्याची ही उल्लेखनीय घटना ठरली आहे. यावेळी विजय वडवेराव, अरविंद बनसोडे, संजय हिवाळे, डॉ. मंजू गौतम राजे-जाधव, मारोती कदम यांच्यासह फुलेप्रेमी कवी, ग्रामस्थ, कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होता.

देशातील पहिली मुलींची शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियान व आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलच्या माध्यमातून विजय वडवेराव देशभरात महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रसार, सामाजिक प्रबोधन आणि संविधान मूल्यांच्या जनजागृतीचे कार्य करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×