Breking News
बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन पूर्ववत करापोलिसांच्या हाती लागू नको, सतत ठिकाणे बदलत राहाराज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्तपुण्यात गॅस सिलिंडरच्या स्फोटात कुटूंबातील तिघे ठार‘पीएलएफएस आणि ‘एएसयुएसई’विभागीय प्रशिक्षण कार्यशाळेला तळेगाव दाभाडे येथे सुरुवातवारजेतील लॉजवर गुन्हे शाखेचा छापमौजमजेसाठी सायकल चोरी; अल्पवयीन ताब्यातयेरवडा कारागृह परिसरात ११ हजार वृक्ष लागवड उपक्रमाचा शुभारंभविद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणीसायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची ६२ लाखांची फसवणूक

विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केली पालखी महामार्गाची पाहणी

आषाढी एकादशी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर व्यवस्थेचा घेतला आढावा

marathinews24.com

पुणे – आषाढी एकादशी यात्रा पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी श्री. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाची पाहणी केली.

अल्पसंख्याक विभागातील रिक्त पदे तातडीने भरा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – सविस्तर बातमी

यावेळी जिल्हाधिकारी गजानन पाटील, उपायुक्त तुषार ठोंबरे यांच्यासह सर्व संबंधित उप विभागीय अधिकारी, उप विभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी आदी उपस्थित होते.

श्रीमती तेली-उगले म्हणाल्या, पालखी मार्गावरील रस्त्यांची स्थिती, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य सुविधा, वाहतूक नियोजन तसेच वारकऱ्यांच्या सोयीसाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली. पालखी सोहळा सुरळीत, सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता वेळेत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

श्रीमती तेली-उगले यांनी आंळदी, देहू, हडपसर, सासवड, जेजुरी, वाल्हे, निरा येथील पालखी मार्गाची पाहणी करुन त्या पुढे सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील पालखी मार्गाची पाहणीकरिता मार्गस्थ झाल्या आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×