दोघा चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – रस्त्याने पायी चाललेल्या तरूणाला दुचाकीस्वार चोरट्यांनी धक्का देउन त्यांच्याशी झटापट केली. त्यांनतर तरूणाच्या खिशातील २५ हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना २९ मे रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास नगर रस्त्यावरील येरवडा मेट्रो स्टेशनजवळ घडली आहे. याप्रकरणी सहकारनगरमध्ये राहणार्या २८ वर्षीय तरूणाने लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दोघा चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मसाले देण्याच्या नावाखाली व्यापाऱ्याची १३ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण सहकारनगरमध्ये राहायला असून, २९ मे रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास ते येरवडा मेट्रो स्टेशन परिसरातून जात होते. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी तरूणाला धक्का दिला. त्यानंतर त्याच्या पायाला दाबून झटापट केली. तक्रारदाराच्या खिशातील २५ हजारांची रोकड चोरून दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपींचा माग काढला जात आहे. सहायक पोलीस निरीक्षक नंदनवर तपास करीत आहेत.
मोलकरणीने लांबवले ११ लाखांचे दागिने
पुणे- घरकाम करणार्या मोलकरणीने मालकीणीची नजर चुकवून घरातील ११ लाख ५ हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना १८ मे ते २ जून २०२६ कालावधीत विश्रांतवाडीतील कैलाश भवनमध्ये घडली आहे. याप्रकरणी ४८ वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार महिलेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आळंदी रोडवरील वैलाश भवनमध्ये राहायला असून, मागील काही महिन्यांपासून त्यांच्याकडे घरकामासाठी महिला येत होती. १८ मे ते २ जून कालवधीत मोलकरणीने तक्रारदार महिलेचे नजर चुकवून कपाटातील ११ लाख ५ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणाची माहिती झाल्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले तपास करीत आहेत.






















