Breking News
बारामतीतील वादळग्रस्त भागातील जनजीवन पूर्ववत करापोलिसांच्या हाती लागू नको, सतत ठिकाणे बदलत राहाराज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्तपुण्यात गॅस सिलिंडरच्या स्फोटात कुटूंबातील तिघे ठार‘पीएलएफएस आणि ‘एएसयुएसई’विभागीय प्रशिक्षण कार्यशाळेला तळेगाव दाभाडे येथे सुरुवातवारजेतील लॉजवर गुन्हे शाखेचा छापमौजमजेसाठी सायकल चोरी; अल्पवयीन ताब्यातयेरवडा कारागृह परिसरात ११ हजार वृक्ष लागवड उपक्रमाचा शुभारंभविद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणीसायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची ६२ लाखांची फसवणूक

लोकसभा सचिवालयातील ग्रंथालय अधिकाऱ्यांची यशदामध्ये क्षमता बांधणी

लोकसभा सचिवालयातील २३ ग्रंथालय अधिकाऱ्यांसाठी पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम

marathinews24.com

पुणे – नवी दिल्लीतील लोकसभा सचिवालयात संशोधन आणि ग्रंथालय विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांसाठी यशदामध्ये क्षमता बांधणी प्रशिक्षण कार्यक्रम यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीच्या (यशदा) वतीने आयोजित करण्यात आला आहे.

विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केली पालखी महामार्गाची पाहणी – सविस्तर बातमी

लोकसभा संशोधन व प्रशिक्षण संस्था (प्राईड) यांनी यांच्यावतीने आयोजित प्रशिक्षण कार्यक्रम यशदाच्या ग्रंथालय येथे आयोजन करण्यात आले आहे. पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संशोधन व ग्रंथालयाच्या कामकाजात अधिकाधिक प्रभावी वापर करण्याच्यादृष्टीने मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये ग्रंथालयांवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा परिणाम, आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल ज्ञान व्यवस्थापन या विषयांवर विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात २३ प्रशिक्षणार्थी अधिकारी सहभागी झाले आहेत.

या कार्यक्रमाचे उद्घाटन यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमहासंचालक पौर्णिमा गायकवाड , ‘प्राईड’चे संचालक पी. के. मल्लिक उपस्थित होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात तज्ज्ञ मार्गदर्शक चेतन टाकसाळे, डॉ. राजेंद्र कुंभार, विश्वास हसे, प्रल्हाद जाधव आदींनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांतर्गत गोवा येथील सेंट्रल लायब्ररी व गोवा विधानसभेला अभ्यासभेट आयोजित करण्यात आली आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमाचे सत्रसंचालक म्हणून यशदाचे ग्रंथपाल शशिकांत चौधरी यांनी तर सहयोगी सत्र संचालक म्हणून विनय कुलकर्णी यांनी काम पाहिले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×