बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी २ लाख २६ हजारावर मारला डल्ला
marathinews24.com
पुणे – भरदिवसा फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी २ लाख २६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना २९ एप्रिलला सकाळी साडेदहाच्या सुमारास शुक्रवार पेठेतील सोसायटीत घडली. याबाबत एकाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, भरदिवसा सदनिकांचे कुलूप तोडून ऐवज चोरून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सुरक्षारक्षक नसलेल्या सोसायटीत चोरटे शिरतात. बंद घरांची पाहणी करुन चोरटे कटावणीने कुलूप तोडून चोरटे ऐवज लंपास करीत असल्याचे दिसून आले आहे.
आत्महत्याचे धाडस नाही झालं …रेल्वे येताच तो बाजूला झाला अन…मित्राचा जीव गेला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शुक्रवार पेठेतील शांतीकुज सोसायटीत राहायला आहेत. मंगळवारी (२९ एप्रिल) सकाळी साडेदहाच्या सुमारास ते फ्लॅट बंद करुन कामानिमित्त बाहेर पडले. चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून आतप्रवेश केला कपाटातील २ लाख २६ हजार रुपयांचे दागिने चोरुन चोरटे पसार झाले. सायंकाळी पाचच्या सुमारास ते कामावरुन घरी परतले असता, घराचे कुलूप तुटल्याचे लक्षात आले. सहायक पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे तपास करत आहेत.