Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

मोक्का कारवाईनंतर गुंगारा, तीन महिन्यांनी सराइताला अटक

पोलिसांना गुंगारा देणार्‍या सराईताला विमानतळ पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्क) कारवाई झाल्यानंतर पोलिसांना गुंगारा देणार्‍या सराईताला विमानतळ पोलिसांनी अटक केली. फिरोज कुतूब खान (वय २६, रा. एसआरए बिल्डींग, विमाननगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. खान सराइत आहे. खान याच्यासह साथीदारांविरुद्ध विमानतळ पोलिसांनी मोक्काअन्वये कारवाई केली होती. कारवाई केल्यानंतर खान पसार झाला होता. गेले तीन महिने तो पोलिसांना गुंगारा देत होता.

गोदाम फोडून तांब्याच्या तारा चोरणार्‍या टोळीला अटक – सविस्तर बातमी 

खान विमाननगर भागातील एसआरए बिल्डींग परिसरात येणार असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी शैलेश नाईक आणि रुपेश पिसाळ यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी, गु्न्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक आशालता खापरे, सहायक निरीक्षक विजय चंदन, पिसाळ, नाईक, राकेश चांदेकर, अंकुश जोगदंडे, दादासाहेब बर्डे, योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, हरिप्रसाद पुंडे, लालू कर्‍हे यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×