Breking News
आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखा-ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामलेआमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्ह्याच्या मागणीसाठी रोहित पवारांचा कोथरूड ठाण्यात ठिय्याधर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता संस्थेची ५० कोटींची जमीन तारणदिशाहीन नियोजन व एफएसआय’च्या अनिर्बंध अतार्किक मंजुऱ्यां मुळे ‘पुणे वाहतुक कोंडीच्या’ संकटात…!भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलतजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली चाकण एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्नएमडी विक्रीच्या तयारीतील त्रिकुटाला बेड्यागणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदमपुण्यातील सराईतांना दणका, २२ जण तडीपारपुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन सराईत तडीपार

पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर परिसरात महिलेचे दागिने चोरीला

पुण्यात दहीहंडीत विनापरवाना लावणी नृत्याचा कार्यक्रम

चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात ज्येष्ठ महिलेच्या पिशवीतून रोकड, सोनसाखळी असा ८३ हजार रुपयांचा ऐवज लांबविण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात बेकायदा वास्तव्य करणारे ३ बांगलादेशी ताब्यात – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६३ वर्षीय ज्येष्ठ महिला मध्य प्रदेशातील इंदूरच्या रहिवासी आहेत. त्या श्रीमंत दगडूशेठ हलवा5 zaई मंदिर परिसरात दर्शनासाठी आल्या होत्या. मंदिराच्या परिसरात गर्दी झाली होती. चोरट्यांनी त्यांच्या पिशवीतून तीन हजारांची रोकड आणि सोनसाखळी असा ८३ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना नुकतीच घडली. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, पोलिसांनी मंदिराच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पोलीस हवालदार गोंजारी तपास करत आहेत. मध्यभागातील लक्ष्मी रस्ता, तुळशीबाग, तसेच रविवार पेठेत खरेदीसाठी आलेल्या महिलांच्या पिशवीतून दागिने, रोकड चोरुन नेण्याच्या घटना नुकत्याच घडल्या.

मांजरीत महिलेचे दागिने हिसकाविले

पादचारी महिलेकडील १ लाख २० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना हडपसरमधील मांजरी परिसरात घडली. याबाबत एका महिलेने मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार ५२ वर्षीय महिला मांजरी परिसरात राहायला आहेत. २७ ऑगस्ट रोजी दुपारी दोनच्या सुमारास त्या मांजरीतील झेड काॅर्नर परिसरातून निघाल्या होत्या. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील एक लाख २० हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. पोलीस कर्मचारी प्रदीप सोनवणे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×