मद्यधुंद अवस्थेत कार थेट बंगल्याच्या गेटवर घातली
marathinews24.com
पुणे – Pune Police Constable Suspended : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या शासकीय निवासस्थानात कार घुसवून अर्धा तास हाय व्होल्टेज ड्रामा क्रिएट करणाऱ्या पोलिस कर्मचारी अमोल वसंतराव भिसे याला निलंबित करण्यात आले आहे. घटनेमुळे पुणे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली होती. भिसे हा मुख्यालयात नेमणुकीस आहे. तो मंगळवारी (दि. ३ नोव्हेंबर) सायंकाळी अमोल भिसे हा चारचाकी वाहनातून पोलीस आयुक्तांच्या कोरेगाव पार्क परिसरातील शासकीय निवासस्थानी पोहोचला. त्यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता.
पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्त – सविस्तर बातमी
सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी त्याला बंगल्यात प्रवेश करण्यास मज्जाव केला. मात्र, त्यानंतर त्याने सुरक्षारक्षकांशी हुज्जत घालत वाहन थेट बंगल्याच्या प्रवेशद्वाराच्या दिशेने नेले. आज गेल्यानंतर जवळपास अर्धा तास ड्रामा केला होता. दरम्यान, पोलीस दलातील बदल्यांची प्रक्रिया सुरू असताना भिसेची बदली अपेक्षित ठिकाणी झाली नाही. त्याची बदली पोलीस मुख्यालयात करण्यात आली होती. या निर्णयामुळे तो नाराज होता. त्याच रागातून त्याने हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती आहे.
ससून रुग्णालयातही गोंधळ; पहाटे मेडिकल
भिसेला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, तेथेही त्याने बराच गोंधळ घातल्याचा आरोप आहे. पहाटे साडेचार च्या सुमारास त्याचे मेडिकल झाल्याची माहिती आहे. दरम्यान, भिसेवर यापूर्वीही शिस्तभंगाची कारवाई झाली होती. २०२५ मध्ये त्याला निलंबित केले होते. त्यानंतर २०२६ मध्ये त्याला पुन्हा सेवेत घेण्यात आले होते. मात्र, आता पोलीस आयुक्तांच्या शासकीय निवास स्थानाबाहेर घडलेल्या गंभीर प्रकारामुळे त्याच्यावर पुन्हा निलंबनाची कारवाई केली आहे.
Pune Police Constable Suspended संबंधित कर्मचाऱ्याच्या वर्तनामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे विभागीय शिस्तभंगाची कारवाई करत त्याला निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणात कायदेशीर कारवाईसोबतच विभागीय चौकशीही होण्याची शक्यता आहे. पोलीस दलात शिस्त आणि जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या कारवाईकडे संपूर्ण पोलीस वर्तुळाचे लक्ष लागले आहे.






















