Breking News
Pune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूकPune Crime News : पैसे परत मागितल्याने तरुणावर कोयत्याने वारPune Bank Loan Fraud : जय भवानी सहकारी बँकेत साडेचार कोटींचा कर्ज घोटाळा

Illegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्त

Illegal Pesticide Stock Seized Pune

शुक्रवार पेठेत कृषी विभागाची मोठी कारवाई; ६५ लाखांचे कीटकनाशक जप्त

marathinews24.com

पुणे – Illegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यातील शुक्रवार पेठ परिसरातील राहुल एजन्सीज या दुकानात परवान्याशिवाय साठवून ठेवलेला ६५ लाख ३४ हजार ४२८ रुपये किमतीचा कीटकनाशकांचा बेकायदेशीर साठा कृषी विभागाच्या पुणे विभागीय भरारी पथकाने जप्त केला आहे. याप्रकरणी दुकानमालक राहुल साहेबराव निकम याच्याविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्ण – सविस्तर बातमी 

संचालक (निविष्ठा व गुण नियंत्रण) सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर आणि तंत्र अधिकारी (गुण नियंत्रण) निलेश गवरी यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अतुल गणपतराव जाधव आणि गुण नियंत्रण निरीक्षक तथा कृषी अधिकारी, पंचायत समिती हवेली येथील सुनील सिताराम रुपनर यांनी १४ व १५ ऑक्टोबर २०२६ रोजी शिवाजी रोड, रामेश्वर चौक, शुक्रवार पेठ येथील राहुल एजन्सीज या दुकानाची तपासणी केली. तपासणीदरम्यान दुकानाच्या परवान्यामध्ये नोंद नसलेला तसेच आवश्यक परवानगीशिवाय साठवून ठेवलेला कीटकनाशकांचा मोठा साठा आढळून आला. याप्रकरणी २२ ऑक्टोबर २०२६ रोजी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जप्त करण्यात आलेल्या साठ्यामध्ये डेल्टामेथ्रिन, इमिडाक्लोप्रिड, क्लोरपायरीफॉस, फिप्रोनिल, सायपरमेथ्रिन यांसह विविध प्रकारच्या कीटकनाशकांचा समावेश आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी १६ ऑक्टोबर २०२६ रोजी पंचनामा करून कीटकनाशकांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले असून संबंधित साठ्याच्या विक्रीवर बंदी घातली आहे. शेतकरी व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बेकायदेशीर कृषी निविष्ठांची विक्री व साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध कृषी विभागाकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×