Breking News
Pune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूकPune Crime News : पैसे परत मागितल्याने तरुणावर कोयत्याने वारPune Bank Loan Fraud : जय भवानी सहकारी बँकेत साडेचार कोटींचा कर्ज घोटाळा

Pune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्ण

Drought Relief for Farmers Maharashtra

मका, कडवळ बियाण्यांचा समावेश; उर्वरित बियाण्यांचे आठवडाभरात वितरण होणार; उर्वरित बियाणे आठवडाभरात मिळणार

marathinews24.com

पुणे – Pune Fodder Cultivation 2026 : संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी पुणे जिल्ह्यात २५ हजार एकर क्षेत्रावर चारा लागवडीचे नियोजन करण्यात आले असून, यासाठी मका आणि कडवळ या चारा पिकांच्या बियाण्यांचे वाटप युद्धपातळीवर सुरू आहे. महाबीज आणि राष्ट्रीय बियाणे महामंडळाकडून प्राप्त झालेल्या २२० टन बियाण्यांपैकी आतापर्यंत ८० टक्के बियाण्यांचे वाटप पूर्ण झाले आहे. उर्वरित बियाणे पुढील आठवडाभरात प्राप्त होणार असून त्याचेही पशुपालक शेतकऱ्यांना वितरण करण्यात येणार आहे.

बियाणे वाटपाला गती; पशुपालकांपर्यंत थेट पोहोच

चारा लागवडीसाठी मका आणि कडवळ या पिकांच्या बियाण्यांचा समावेश आहे. तालुका पशुसंवर्धन अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालील प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत नोंदणीकृत पशुपालक शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात येत आहे. उर्वरित बियाणे प्राप्त होताच त्याचेही तातडीने वितरण करण्याचे नियोजन आहे. अधिकाधिक क्षेत्रावर चारा उत्पादन घेऊन आगामी टंचाईच्या काळात पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यावर भर देण्यात येत आहे.

चारा साक्षरता अभियानातून शास्त्रीय मार्गदर्शन

चारा लागवडीसोबतच चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन आणि संवर्धन करण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या सहभागातून चारा साक्षरता प्रशिक्षण अभियानांतर्गत कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. यामध्ये चाऱ्याचे नियोजन, उपलब्ध चाऱ्यापासून मुरघास निर्मिती आणि भविष्यातील टंचाईच्या काळासाठी चारा साठवणूक व संवर्धन याबाबत पशुपालकांना मार्गदर्शन केले जात आहे.

अझोला, युरिया प्रक्रियेची प्रात्यक्षिके

कार्यशाळांमध्ये पर्यायी चारा स्रोत म्हणून अझोला उत्पादनाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येत आहे. तसेच वाढलेल्या चाऱ्यावर युरिया प्रक्रिया करून त्याची पौष्टिकता वाढविणे आणि सकस चारा तयार करण्याचे तंत्रही समजावून सांगितले जात आहे. स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पशुपालकांचे नियमित प्रबोधन करण्यात येत आहे. या उपाययोजनांमुळे पशुधनाची उत्पादकता टिकवून ठेवण्यास मदत होणार आहे.

टंचाईपूर्व नियोजनावर प्रशासनाचा भर

शासनाच्या नवीन धोरणानुसार अधिकाधिक चारा उत्पादनावर लक्ष केंद्रित करून जिल्ह्यात उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आणि जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजेश कुमार वासनिक यांच्या मार्गदर्शनाखाली बियाणे वितरण, चारा लागवड, चारा संवर्धन आणि पशुपालक प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आले आहे. संभाव्य टंचाईच्या काळात पशुधनाला पुरेसा व सकस चारा उपलब्ध व्हावा, यासाठी प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांना प्राधान्य दिले जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×