जेष्ठ नागरिकाची २० लाखांची फसवणूक
marathinews24.com
पुणे – एसआयआर फॉर्ममध्ये वडिलांचे नाव जुळत नसल्याची बतावणी करत सायबर चोरट्याने जेष्ठ नागरिकाला व्यवस्थित फॉर्म भरून देण्याची बतावणी केली. त्यांच्या मोबाइलचा अॅक्सेस घेउन बँक खात्यातील १९ लाख ४० हजारांची फसवणूक केली आहे. ही घटना १८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२६ कालावधीत वानवडीत घडली आहे. याप्रकरणी ७२ वर्षीय नागरिकाने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ७२ वर्षीय नागरिक असून, ते वानवडी परिसरात राहायला आहेत. १८ ऑक्टोबरला सायबर चोरट्याने त्यांना संपर्क साधून एसआयआर फॉर्ममध्ये वडिलांचे नाव जुळत नसल्याचे सांगितले. तुमचे नाव व्यवस्थित जुळवून देतो, अशी बतावणी करीत सायबर चोरट्याने त्यांच्या मोबाइलचा अॅक्सेस घेतला. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातील १९ लाख ४० हजार रुपये वर्ग करुन घेत ऑनलाईनरित्या फसवणूक केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक डाबेराव तपास करीत आहेत.
शेअरमध्ये गुंतवणूकीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक
शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देण्याची बतावणी करीत सायबर चोरट्याने तरुणाला तब्बल ८ लाख ५७ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १७ मे ते १९ जून २०२६ कालावधीत विश्रांतवाडीत घडली आहे. याप्रकरणी ३९ वर्षीय तरुणाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, बँकखातेधारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे विश्रांतवाडीत राहायला असून, १७ मे रोजी सायबर चोरट्याने त्यांना संपर्क साधला. शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने त्यांना एका व्हॉटसअॅप ग्रुपमध्ये समाविष्ट करुन घेण्यात आले. चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी करीत सायबर चोरट्याने तक्रारदाराला तब्बल ८ लाख ५७ हजारांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मात्र, त्यांना कोणताही परतावा न देता फसवणूक केली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे तपास करत आहेत.























