अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी दीड लाखांच्या रोकडसह १ लाख ६० हजारांचा ऐवज चोरुन नेला आहे. ही घटना ३ ते ४ नोव्हेंबरला येरवड्यातील भाटनगर या ठिकाणी घडली आहे. याप्रकरणी ४९ वर्षीय नागरिकाने लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबन – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे येरवड्यातील भाटनगरात राहायला असून, ३ ते ४ नोव्हेंबर कालावधीत त्यांचे घर बंद होते. त्यावेळी चोरट्याने घराचे कुलूप तोडून कपाटातील लॉकर चावीने उघडले. त्यानंतर दीड लाखांची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने असा मिळून १ लाख ६० हजारांचा ऐवज चोरुन नेला. दुसर्या दिवशी तक्रारदाराला घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक वैâलास डाबेराव तपास करत आहेत.
धनकवडीत तरुणाचा लॅपटॉप चोरीला
भाजी मार्केटमधील लाखेंडी रॅकवर ठेवलेला ७५ हजारांचा लॅपटॉप चोरट्याने चोरुन नेला आहे. ही घटना ४ नोव्हेंबरला सकाळी सव्वा आठच्या सुमारास मार्वेâटयार्डातील शेखर बडदे यांच्या भाजी मार्केट गाळ्यात घडली आहे. याप्रकरणी आंबेगाव पठार परिसरात राहणार्या २६ वर्षीय तरुणाने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अमलदार शंकर पवार तपास करत आहेत.























