Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

पुण्यातील गणेशोत्सव निर्बंधमुक्त पाहिजे

पुण्यातील गणेशोत्सव निर्बंधमुक्त पाहिजे

पोलीस आयुक्तालयातील बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांची मागणी

marathinews24.com

पुणे – गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सव निर्बंधमुक्त असायला हवा, अशी मागणी पोलीस आयुक्तालयात पार पडलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत करण्यात आली. गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेशोत्सव, दहीहंडी उत्सव पार पाडण्यासाठी सहकार्य करावे. ध्वनीवर्धकाबाबत दिलेल्या नियमावलींचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले.

शंभरावे मराठी साहित्य संमेलन मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मोठी संधी – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील – सविस्तर बातमी 

आगामी दहीहंडी उत्सव, तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्तालयात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक शनिवारी पार पडली. या वेळी आमदार हेमंत रासने, भारतीय जनता पक्षाचे गटनेते गणेश बिडकर, शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) रवींद्र माळवदकर, शिवसेना (शिंदे गट) किरण साळी, हेमंत बागुल यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डाॅ. प्रशांत अमृतकर उपस्थित होते.

‘गणेशोत्सव उत्साहात, तसेच नियमांचे पालन करुन साजरा करावा. उत्सवाच्या काळात गर्दी, वाहतूक व्यवस्थापन या बाबी महत्वाच्या आहेत. ध्वनीप्रदुषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने नियमावली जाहीर केली आहे. गणेशोत्सव उत्साहात साजरा करताना कार्यकर्त्यांनी नियमांचे पालन करावे. कार्यकर्त्यांच्या सूचना विचारात घेऊन प्राणप्रतिष्ठा सोहळा, तसेच विसर्जन सोहळ्याचे नियोजन करण्यात येणार आहे. मर्यादित स्वरुपात ध्वनीवर्धकाचा वापर करावा. याबाबतची नियमावली लवकरच जाहीर करण्यात येईल. कार्यकर्त्यांनी पोलिसांना सहकार्य करावे’, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केले.

गणेशाेत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा देण्यात आला. पुण्यातील गणेशोत्सवाला वैभवशाली परंपरा आहे. कार्यकर्ते सजग आहेत. उत्सवाच्या कालावधीत देश, तसेच परदेशातून भाविक येतात. गणेशोत्सव निर्बंधमुक्त हवा, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन पोलिसांनी नियमावली करावी. एकतर्फी निर्बंध उत्सवावर लादण्यात येऊ नये.

– हेमंत रासने, आमदार, भारतीय जनता पक्ष, कसबा मतदार संघ

गणेशोत्सवाला १३२ वर्षाची वैभवशाली परंपरा आहे. उच्च क्षमतेच्या ध्वनीवर्धक यंत्रणा, लेझर दिव्यांच्या झोताला विरोध आहे. कालानुरुप उत्सवात बदल होत गेले. विधायक काम करणाऱ्या मंडळांच्या पाठीशी उभे राहायला हवे. राज्य उत्सव जाहीर केल्यानंतर निधी उपलब्ध करुन दिला जातो. या निधीचा विनियोग योग्य पद्धतीने व्हायला हवा. उत्सवसाठी करण्यात आलेली नियमावली महिनाभर आधी जाहीर करण्यात येते. गणेशोत्सवात पूर्वीपासून तरुण कार्यकर्ते सहभागी होतात. नियमांचे पालन करणे करणे गरजेचे आहे. उत्सव हा निर्बंधमुक्त असायला हवा.

– रवींद्र माळवदकर, माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×