Breking News
Census 2027 Training Pune : जनगणना २०२७ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्नShivneri Fort Conservation Campaign : संविधान दिनानिमित्त किल्ले शिवनेरीवर स्वच्छता व संवर्धन अभियानाचा शुभारंभShiv Sena Bhavan Pune News : शिवसेना भवन पुणे येथे आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने संविधान दिन साजरा26/11 Mumbai Attack Martyrs Tribute Pune : पुणे शहर पोलिसांसह पुणेकरांची मुंबई २६ / ११ हल्ल्यातील हुतात्म्यांना मानवंदनाPune Vigyan Nandi Sammelan : विज्ञान साहित्यात ज्ञानभाषा व लोकभाषेचा संगम व्हायला हवाBaburao Shewale Hospital : लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक काम केल्यास परिसराचा कायापालट शक्य : सिद्धार्थ शिरोळेPune Cyber Crime News : पोलीस असल्याची बतावणी, जेष्ठाला ११ लाखांचा गंडाPune Crime News : धक्का लागल्यामुळे तरुणावर केला गोळीबारConstitution Day Rally Pune 2026 : संविधान दिनानिमित्त पुण्यात भव्य संविधान रॅली उत्साहात संपन्नAccident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

BARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहिती

BARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहिती

उषा कांबळे यांच्या एकपात्री नाट्यप्रयोगातून ‘मी सावित्रीबाई बोलतेय’च्या माध्यमातून स्त्री शिक्षणावर प्रकाश

marathinews24.com

पुणे – BARTI Schemes Pune : पुणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमातून गणेशखिंड येथील मॉडर्न आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बार्टीच्या विविध योजना, उपक्रम तसेच त्यांचा लाभ घेण्याच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्काराने गौरव – सविस्तर बातमी 

‘लोकसंवाद-२०२६’* च्या माध्यमातून विविध शासकीय विभागांच्या योजना, उपक्रम आणि लोककल्याणकारी सेवांची माहिती नागरिक व विद्यार्थ्यांपर्यंत थेट पोहोचविण्यात येत आहे. याच उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात बार्टीच्या BARTI Schemes Pune प्रकल्प अधिकारी शीतल बंडगर यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. योजनांसाठीची पात्रता, अर्ज प्रक्रिया, उपलब्ध संधी तसेच योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबींबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी समतादूत उषा कांबळे यांनी ‘मी सावित्रीबाई बोलतेय’ या एकपात्री नाट्यप्रयोगातून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचे प्रभावी सादरीकरण केले. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना सावित्रीबाई फुले यांनी केलेले कार्य, त्यांना आलेल्या सामाजिक अडचणी आणि शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनासाठी दिलेले योगदान या नाट्यप्रयोगातून प्रभावीपणे मांडण्यात आले.

कार्यक्रमास भौतिकशास्त्र विभागप्रमुख तथा महाविद्यालयाच्या समान संधी केंद्राचे समन्वयक वाघमारे, भूगोल विभागप्रमुख  मोरे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य खरात यांचे सहकार्य लाभले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×