Breking News
Mukhyamantri Gramin Pashudhan Yojana : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्जCarl Ross Filmmaking : साचेबद्धपणा टाळून चित्रपट निर्मिती करा-कार्ल रॉसSenior Citizen Health Camp : सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरBlood Donation Campaign : सेवा संकल्प अभियानातून ‘रक्तदानाचा संकल्प’; पुणे जिल्ह्यात जीवनदानाची चळवळPune Police Suicide : पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्याPune Crime Branch : पुण्यात एक वर्षापासून फरार आरोपीला अटकVishrantwadi Crime : दुचाकी पार्किंगचा वाद कोयते उगारण्यावरMobile Banking Fraud : मोबाइल बँकिंगचा घेतला ताबा, १० लाखांचा गंडाPune Graduate Teacher Election : पुणे विभाग पदवीधर, शिक्षक द्विवार्षिक निवडणूक- २०२६; जिल्हास्तरीय माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती कार्यान्वितBajaj Pune Grand Tour : बजाज पुणे ग्रँड टूरला UCI 2.1 श्रेणी; २६ ते ३१ जानेवारीदरम्यान सहा टप्प्यांची स्पर्धा

National Excellence Award : राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्काराने गौरव

National Excellence Award : राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्काराने गौरव

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया आणि सूर्यभारत इंडस्ट्रियल रिसर्च ज्ञानपीठाचा गौरव

marathinews24.com

मुंबई – राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांना राष्ट्रीय उत्कृष्टता (National Excellence Award) पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच सूर्यभारत इंडस्ट्रियल रिसर्च ज्ञानपीठाच्या (एसबीआयआरडी) नाविन्यपूर्ण संशोधन, नवोपक्रम निर्मिती आणि उद्योग विकास क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दलही सन्मान केला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे नुकत्याच आयोजित विशेष समारंभात हा पुरस्कार एसबीआयआरडी’च्या संस्थापक-संचालिका श्रीमती सुषमा चोरडिया यांनी राज्यपालांच्या हस्ते स्वीकारला.

नांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणी – सविस्तर बातमी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘महाराष्ट्र लोकभवन सेवा संकल्प अभियान’अंतर्गत मैत्री पीस फाउंडेशनतर्फे ‘नॅशनल एक्सलन्स अवॉर्ड्स’ वितरण समारंभाचे (National Excellence Award) आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते दिव्यांग व्यक्तींना गतिशीलता साधनांचेही वितरण करण्यात आले. सामाजिक कल्याण व सक्षमीकरणासाठी कार्यरत विविध संस्था, मान्यवर आणि निमंत्रित या समारंभास उपस्थित होते. प्रा. डॉ. चोरडिया यांच्या उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील सुमारे ४५ वर्षांच्या योगदानाचा, मानवी क्षमतांच्या विकासासाठीची बांधिलकी, भविष्यातील आव्हानांसाठी सक्षम संस्था उभारण्याचे कार्य आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदान यांचा हा गौरव आहे.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना ‘डिस्टिंग्युश्ड लॉरेट फॉर एज्युकेशनल एक्सलन्स, नेशन बिल्डिंग’ या विशेष सन्मानाने गौरविण्यात आले. त्यांच्या दीर्घकालीन कार्याची दखल घेत शिक्षण क्षेत्रातील परिवर्तन, शैक्षणिक उत्कृष्टता, नाविन्यपूर्णता, उद्योजकता, उद्योग क्षेत्राशी असलेला सहभाग आणि सर्वांगीण मानवी विकास यांचा समन्वय साधणारी परिसंस्था निर्माण केल्याबद्दल गौरव करण्यात आला. तसेच, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या परिवर्तनकारी तत्त्वांशी सुसंगत बहुविद्याशाखीय, कौशल्याधारित, अनुभवाधारित आणि तंत्रज्ञान-सक्षम शिक्षणाला चालना देणाऱ्या त्यांच्या दूरदृष्टीचीही दखल घेण्यात आली.

National Excellence Award जिष्णु देव वर्मा यांनी देशाच्या प्रगतीसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी सामाजिक योगदानाचे महत्त्व +अधोरेखित केले. ‘मैत्री पीस फाउंडेशन’च्या सामाजिक कार्याचे तसेच दिव्यांग व्यक्ती आणि समाजातील विविध घटकांना सहाय्य देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “राज्यपालांच्या हस्ते सन्मान स्वीकारणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. शिक्षण क्षेत्रातील प्रगती, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि मानवी क्षमतांचा विकास यांना चालना देतानाच राष्ट्रनिर्माणात मोलाचे योगदान देणारे सक्षम व भविष्यासाठी सज्ज नागरिक घडवण्याच्या कार्यासाठी हा सन्मान प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारा आहे. ‘एसबीआयआरडी’च्या माध्यमातून उद्योजकता, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दिशेने कार्य केले जात आहे. विद्यार्थी, संशोधक, नवोन्मेषक, उद्योजक, उद्योग क्षेत्रातील व्यावसायिक आणि भावी उद्योजक यांना ‘कल्पनेपासून प्रत्यक्ष उपक्रमापर्यंत’च्या प्रवासात आवश्यक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.”

सुषमा चोरडिया म्हणाल्या, “प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया आणि ‘एसबीआयआरडी’ला मिळालेला हा सन्मान शिक्षण, नाविन्य, संशोधन, उद्योजकता, सामाजिक जबाबदारी आणि सर्वांगीण मानवी विकास यासाठी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेणारा आहे. ‘सूर्यदत्त’तर्फे सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबविण्यात येतात. दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव व गतिशीलतेसाठी आवश्यक साधने उपलब्ध करून देणे, तसेच ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना सायकली, शालेय दप्तरे आणि आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करणे यांसारख्या उपक्रमांचा त्यामध्ये समावेश आहे.”

या National Excellence Award महत्त्वपूर्ण राष्ट्रीय सन्मानाच्या निमित्ताने सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आणि सूर्यदत्त मल्टिडिसिप्लिनरी इंटिग्रेटेड कॅम्पस, पुणे येथील विद्यार्थी, प्राध्यापक आणि संपूर्ण टीमने प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व श्रीमती सुषमा चोरडिया यांचे अभिनंदन केले. या समारंभास सूर्यदत्त मल्टिडिसिप्लिनरी इंटिग्रेटेड कॅम्पस, पुणे येथील सुमारे ४० विद्यार्थी आणि १० प्राध्यापक उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×