Breking News
Census 2027 Training Pune : जनगणना २०२७ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण संपन्नShivneri Fort Conservation Campaign : संविधान दिनानिमित्त किल्ले शिवनेरीवर स्वच्छता व संवर्धन अभियानाचा शुभारंभShiv Sena Bhavan Pune News : शिवसेना भवन पुणे येथे आ.डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वतीने संविधान दिन साजरा26/11 Mumbai Attack Martyrs Tribute Pune : पुणे शहर पोलिसांसह पुणेकरांची मुंबई २६ / ११ हल्ल्यातील हुतात्म्यांना मानवंदनाPune Vigyan Nandi Sammelan : विज्ञान साहित्यात ज्ञानभाषा व लोकभाषेचा संगम व्हायला हवाBaburao Shewale Hospital : लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक काम केल्यास परिसराचा कायापालट शक्य : सिद्धार्थ शिरोळेPune Cyber Crime News : पोलीस असल्याची बतावणी, जेष्ठाला ११ लाखांचा गंडाPune Crime News : धक्का लागल्यामुळे तरुणावर केला गोळीबारConstitution Day Rally Pune 2026 : संविधान दिनानिमित्त पुण्यात भव्य संविधान रॅली उत्साहात संपन्नAccident News : वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिर

Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिर

त्रुटी पूर्ततेसाठी २२ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान दर मंगळवार, बुधवार व गुरुवारी शिबिर

marathinews24.com

पुणे – सेवा संकल्प अभियानांतर्गत अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, (Caste Validity Certificate Pune) इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग (मराठा) या आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, पुणे यांच्या वतीने विशेष शिबिर व त्रुटी पूर्तता कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहिती – सविस्तर बातमी 

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये आरक्षित प्रवर्गातून व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. (Caste Validity Certificate Pune) शासनाने विशेष बाब म्हणून अशा विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी प्रवेश घेतल्यापासून तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.

या कालावधीत जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रकरणे सादर केलेल्या, मात्र प्रकरणातील त्रुटींमुळे अद्याप जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दि. २२ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर दर आठवड्याला मंगळवार, बुधवार व गुरुवार या दिवशी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रकरणातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय स्वतः किंवा पालकांमार्फत समितीसमोर उपस्थित राहता येईल. नियमानुसार त्रुटींची पूर्तता झालेल्या प्रकरणांमध्ये पात्र विद्यार्थ्यांना तत्काळ जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येत आहे.

अद्याप जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त न झालेल्या संबंधित विद्यार्थ्यांनी या विशेष शिबिराचा लाभ घेऊन आपल्या प्रकरणातील त्रुटींची पूर्तता करावी, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, पुणे यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×