मीड प्रेशर, प्लाझ्मा डीजे उपकरणांची थेट जप्ती
marathinews24.com
पुणे – शहरात गणेशोत्सवासह दहीहंडी निर्बंधमुक्त साजरा करण्याची मागणी गणेश मंडळ, कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. मात्र, उत्सवाच्या नावाखाली डीजेच्या कर्णकर्कश आवाजाला पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी विरोध दर्शविला आहे. नियमांचे उल्लंघन करून तीव्र आवाजात मीड प्रेशर, प्लाझामा वाजवणार्या डीजेवर थेट जप्तीची कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. उत्सव साजरा करण्यास विरोध नाही; मात्र तीव्र आवाज करणार्या डीजेविरूद्ध कारवाई करताना मुलाहिजा बाळगणार नसल्याचे प्रशासनाने अमितेश कुमार यांनी सांगितले.
सण-उत्सवात कर्णकर्कश डीजे वादनांच्या वाढत्या प्रवृत्ती आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून प्राधान्य देण्यात आले आहे. मात्र, सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी, गणेश मंडळांकडून डीजे वादनासाठी आग्रह धरला जात आहे. त्यापार्श्वभूमीवर सुवर्णमध्य काढण्यास पोलीस, महानगरपालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यातच गणेशोत्सवाच्या अनुषंगाने महापालिकेत सोमवारी (दि.२४) विविध विभाग, पोलीस प्रशासनासह गणेश मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडण्यासाठी विविध मुद्दयावर चर्चा करण्यात आली. मंडळांच्या कार्यकर्त्यांनी उत्सव वरील निर्बंध शिथिल करून निर्बंधमुक्त वातावरणात सण साजरा करण्याचा आग्रह धरला आहे.
प्लाझा, मिड प्रेशन उपकरणांवर थेट जप्तीची कारवाई
कर्णकर्कश डीजेंच्या वादनामुळे मध्यवर्ती भागातील अनेकांनी यापुर्वीही तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर यंदाच्या उत्सवात ध्वनी प्रदूषणाला आडकाठी निर्माण करण्यासाठी प्रशासनाने ठोस भूमिका घेतली आहे. डीजे, प्लाझा, मिड प्रेशर सारख्या कर्णकर्कश आवाज करणार्या वादनावर पूर्णपणे बंदी घातली आहे. निमयांचे उल्लंघन करून डीजे वादन करणार्या संबंधित उपकरणांवर थेट जप्तीची कारवाईचा इशारा आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.
नियमांचे पालन करणे बंधनकारक
उत्सवात ध्वनिक्षेपकाच्या वापराबाबत निश्चित केलेल्या नियमांचे पालन करणे सर्र्वांनाच बंधनकारक राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आवाजाची असलेली मर्यादा ओलांडली जाऊ नये, यासाठी मंडळांनाही दक्षता घ्यावी लागणार आहे. तसेच ध्वनीची पातळी निश्चित केली जाणार असून, डीजेमध्ये किती ‘बेस’ आणि किती ‘टॉप’ वापरता येईल, याबाबतही चर्चा केली जाणार आहे.
ध्वनीप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून यंदा कठोर भूमिका घेण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करून मर्यादेपेक्षा अधिक आवाजात कर्णकर्कश डीजे वाजविणार्याविरूद्ध कारवाई केली जाणार आहे. थेट डीजे उपकरण जप्ती करण्यात येईल. ध्वनिप्रदूषण करणार्या तीव्र आवाजाला परवानगी दिली जाणार नाही.
-अमितेश कुमार, पोलीस आयुक्त





















