Breking News
एस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरी

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरी

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात विविध क्रीडा जनजागृतीपर उपक्रम

marathinews24.com

पुणे – मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटना आणि फोरसाईट कॉलेज ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने विविध क्रीडा जनजागृतीपर प्रभातफेरीचे आयोजन नुकतेच करण्यात आले.“खेळा, निरोगी राहा आणि देशाच्या क्रीडा विकासात योगदान द्या” असा संदेश यावेळी देण्यात आला.

हातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकार – सविस्तर बातमी 

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील विविध संधी, शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व, नियमित व्यायाम, शिस्त आणि खेळाडूवृत्ती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विविध क्रीडा प्रकारांचे सादरीकरण तसेच जनजागृतीपर उपक्रम घेण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन तायक्वांदो अध्यक्ष नामदेव शिरगावकर, अर्जुन पुरस्कार विजेते व कबड्डीपटू शांताराम जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, फोरसाईट कॉलेज ऑफ कॉमर्सचे सचिव शैलेश मेहता, सहा. जिल्हा क्रीडा अधिकारी दादासाहेब देवकाते, राजाभाऊ कोळी तसेच ताहेर अस्सी उपस्थित होते.

यावेळी माणिक चंदर देवकर, श्रीमती ऐश्वर्या आशुतोष साठे, चंद्रकांत ननावरे, अल्लाबक्ष शेख, दुर्योधन जठार, प्रल्हाद कारकर, जे. जे. के. जोशी,सुनील सातव, लक्ष्मण विठोबा सणस, मनोज धिवार, राहुल सर्जेराव नवले, संदीप कोळेकर, राजेंद्र गोविंद शेटे, प्रविण हिंगे आदींचा क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल पुष्पगुच्छ, शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×