Breking News
आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखा-ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामलेआमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्ह्याच्या मागणीसाठी रोहित पवारांचा कोथरूड ठाण्यात ठिय्याधर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता संस्थेची ५० कोटींची जमीन तारणदिशाहीन नियोजन व एफएसआय’च्या अनिर्बंध अतार्किक मंजुऱ्यां मुळे ‘पुणे वाहतुक कोंडीच्या’ संकटात…!भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलतजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली चाकण एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्नएमडी विक्रीच्या तयारीतील त्रिकुटाला बेड्यागणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदमपुण्यातील सराईतांना दणका, २२ जण तडीपारपुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन सराईत तडीपार

कात्रजमध्ये वाहनाच्या धडकेत श्वानाचा मृत्यू

कात्रजमध्ये वाहनाच्या धडकेत श्वानाचा मृत्यू

भरधाव चारचाकीची श्वानाला धडक; वाहनचालक अपघातानंतर पसार

marathinews24.com

पुणे – वाहनाच्या धडकेत श्वानाचा मृत्यू झाल्याची घटना कात्रजमधील संतोषनगर भागात घडली. अपघातानंतर पसार झालेल्या वाहन चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत शहबाज मेहमूद खान (वय ५२, रा. अशोका आगम बिल्डिंग, संतोषनगर, कात्रज ) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका चारचाकी वाहन चालकाविरुद्ध मोटार वाहन कायदा, तसेच प्राणी संरक्षण अधिनियम कलम ११ (१) (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मी रस्त्यावर महिलेच्या पिशवीतून दागिने चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खान यांच्या घरासमोर एका भटक्या श्वानाचा वावर होता. २३ ऑगस्ट रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास भरधाव चारचाकी वाहनाने श्वानाला धडक दिली. अपघातानंतर मोटार चालक पसार झाला, असे खान यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस हवालदार जगताप तपास करत आहेत.

सहकारनगरमधील बंगल्यातून दोन लाखांचे दागिने चोरी

सहकारनगर परिसरातील बंगल्यातून चोरट्याने दोन लाख १३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि कुटुंबीय हे संतनगरमधील स्वामी विवेकानंद सोसायटीत राहायला आहेत. शयनगृहात कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने चाेरुन नेण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. दागिने चोरणारा चाेरटा माहितगार असल्याचा संशय महिलेने फिर्यादीत व्यक्त केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत संघर्षी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×