Breking News
एस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरासLokSamvad 2026 : रक्तदान केल्याने गरजू रुग्णाला जीवदान तर रक्तदान दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे – डॉ. विद्या राठोडBibwewadi Crime : कार मागे घेण्यास सांगितल्याच्या वादातून तरुणावर हल्ला‘Bappa.org’ च्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाच्या परंपरा जगासमोर आणाMundhwa Drug Smuggler : अमली पदार्थ तस्कर महिला वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

पुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

डेसिबल मर्यादेचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा

marathinews24.com

पुणे – जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक शुक्रवारी पुणे ग्रामीण पोलिसांच्या मुख्यालयात पार पडली. ‘गणेशोत्सवात ध्वनीक्षेपक व्यवस्थेतील ‘प्लाझ्मा साऊंड’, तसेच प्रखर लेझर झोतांवर बंदी घालण्यात आली आहे. डिसेबल मर्यादेचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल’, असा इशारा पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिला.

राज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात – सविस्तर बातमी

पुणे जिल्ह्यातील विविध भागात ५ हजार ३०० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियोजन करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील प्रमुख १५० मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पाषाण रस्त्यावरील मुख्यालयात शनिवारी आयोजित केली. या बैठकीस पुणे जिल्ह्यातील मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. अतिरिक्त पोलीस अधीक्षक शुभम कुमार, गणेश बिरादार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर पोलीस अधीक्षक गिल पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘ गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या. ध्वनीक्षेपक व्यवस्थेतील प्लाझ्मा साऊंड, तसेच लेझर झोतांवर बंदी घालण्यात आली आहे.

कार्यकर्त्यांनी ध्वनीक्षेपकांचा वापर करावा. मात्र, डेसिबल मर्यादेचे उल्लंघन होता कामा नये. डेसिबल मर्यादा ओलांडल्यास पदाधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या बैठकीस जिल्हाधिकारी कार्यालय, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागातील समस्या मांडल्या. उत्सवाच्या कालावधीत येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यात येणार आहे. कार्यकर्त्यांनी आनंद आणि उत्साहात उत्सव साजरा करावा. मात्र, नियमावलीचे उल्लंघन करु नये. उत्सवाच्या काळात ग्रामीण भागात कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहचविणाऱ्यांविरुद्द कारवाई करण्यात येईल’

‘नसरापूर, पिंपळवंडीच्या पार्श्वभूमीवर सजग रहावे

‘नसरापूर, तसेच जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात घडलेल्या अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी सतर्क रहावे. ग्रामीण भागात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची कमतरता आहे. कार्यकर्त्यांनी वर्गणीतून जमा झालेल्या रक्कमेतून गावांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास त्याचा निश्चितच फायदा होईल. उत्सवाच्या काळात होणाऱ्या गर्दीवर कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवता येईल, तसेच गैरप्रकारांना आळा बसेल’, अशा सूचना पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिल्या.

अमली पदार्थ विरोधी माेहिमेत मंडळांचा सहभाग महत्त्वाचा

‘स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी योगदान दिले. उत्सवाच्या माध्यमातून समाज प्रबोधन व्हायला हवे. ग्रामीण भागातील युवकांमध्ये अमली पदार्थ विरोधी जागरुकता निर्माण करण्यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भित्तीचित्रे, फलक लावावेत. ‘से नो टू ड्रग्ज’ या मोहिमेत सहभागी व्हावे, तसेच सायबर गु्न्ह्यांना आळा घालण्यासाठी कार्यकर्त्यांनी जागरुकता निर्माण करावी’, असे आवाहन गिल यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×