Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुण्यात वाहतूक विभागाने हाती घेतले मिशन; बेवारस ३६५ वाहनांसाठी मालकांना केले आवाहन

मालकी हक्क दाखवून वाहने न्या, अन्यथा लिलावात होणार विक्री

marathinews24.com

पुणे – शहरातील वाहतूक विभागाच्या अख्यारित वर्षानुवर्षे पडून असलेली बेवारस वाहने हटविण्याची मोहिम प्रशासनाने हाती घेतली आहे. त्यानुसार संबंधितांनी मालकी हक्काची कागदपत्रे दाखवून वाहन नेण्यासाठी प्राधान्य द्यावे. विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणात वाहने जप्त केली होती. संबंधित ३६५ वाहने मालकांनी कागदपत्रे दाखवून गाड्या घेउन जाण्याच्या सूचना पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केल्या आहेत. त्यासोबत समर्थ वाहतूक विभागातंर्गत ५५ बेवारस वाहनेही संबंधितांनी कागदपत्रे सादर करून नेण्याचे आवाहन केले आहे.

आत्महत्याचे धाडस नाही झालं … रेल्वे येताच तो बाजूला झाला अन… मित्राचा जीव गेला – सविस्तर बातमी 

बेशिस्तपणे वाहने चालविल्याप्रकरणी अनेकांविरूद्ध वाहतूक विभागाकडून कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर संबंधितांची वाहने ताब्यात घेत वाहतूक विभागाने कारवाई केली होती. मात्र, वर्षानुवर्षे संबंधित वाहने घेउन जाण्यासाठी मालकांनी पुढाकार घेतला नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वाहतूक विभागात बेवारस वाहनांचा ढीग लागत आहे. त्यापार्श्वभूमीवर संबंधित वाहन मालकांनी मालकी हक्क प्रस्थापित करून आपआपली वाहने ताब्यात घ्यावी. अन्यथा महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ८७ मध्ये दिलेल्या तरतुदी प्रमाणे कारवाई करुन विनधनी / बेवारस वाहने शासनाच्या स्वाधीन असल्याचे समजून वाहने लिलावाने विकण्याचा इशारा वाहतूक विभागाने दिला आहे.

वाहतूक विभागाकडे ३६५ वाहने असून, संबंधित वाहन मालकांनी आपला मालकी हक्क सिद्ध करावा. त्यानंतर तातडीने ही वाहने त्यांना देण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. बिनधनी वाहनात दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांचा समावेश असून, उद्घोषणा प्रसिध्द झाल्यापासून १५ दिवसाच्या आत संबंधिता पोलीस निरीक्षक / सहायक पोलीस निरीक्षकाकडून वाहने समक्ष उपस्थित राहून ताब्यात घ्यावीत. नागरिकांनी अर्जासह मालकी हक्क दर्शविणारी कागदपत्रे सबंधित वाहतुक विभागाच्या प्रभारी अधिकार्‍यांना सादर करावीत. तसेच समर्थ वाहतुक विभागांर्तगत ५५ वाहने याठिकाणी अटकावून ठेवली आहेत. त्या वाहन मालकांनीही वाहने ताब्यात घेण्यासाठी प्राधान्य देण्याचे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

पुणे वाहतूक विभागातंर्गत सध्यस्थितीत ३६५ वाहने पडून आहेत. संबंधित वाहने मूळमालकांना देण्याची प्रक्रिया राबविण्यात येत असून, मालकांनी कागदपत्रे दाखवून वाहने ताब्यात घ्यावी. जेणेकरून त्या-त्या वाहतूक विभागातील राडारोडा कमी होण्यास मदत होणार आहे. – अमोल झेंडे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×