अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – क्रेडीट कार्य वापराचे“रिवार्ड पाॅईंट’ देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची दोन लाख ८२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे एरंडवणे भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. क्रेडीट कार्ड वापराचे ‘रिवार्ड पाॅईंट’ देण्यात येणार आहे, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले. चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर एक लिंक पाठविली होती. ही लिंक उघडल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून दोन लाख ८२ हजार रुपये लांबविले.
महावितरणमधील वायरमनने घेतली २ लाखांची लाच – सविस्तर बातमी
तक्रारदाराचा मोबाइल क्रमांक बँक खात्याशी जोडण्यात आला होता. मोबाइल क्रमांक ‘हॅक’ (तांत्रिक ताबा) करुन चोरट्यांनी खात्यातून पैसे लांबविले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम तपास करत आहेत.
शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने १७ लाखांची फसवणूक
पुणे-शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी वारजे भागातील एकाची १७ लाख १८ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५१ वर्षीय तक्रारदार हे वारजे माळवाडी परिसरात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला, शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले. चोरट्यांच्या बँक खात्यात त्यांनी वेळोवेळी पैसे जमा केले. पैसे जमा केल्यानंतर त्यांना परतावा दिला नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी तपास करत आहेत.























