शेतकऱ्याला कॅरेक्टर खराब करुन टाकीनाची दिली होती धमकी
marathinews24.com
बीड : (अनंत जाधव) – राज्यातील विविध प्रशासकीय कार्यालयात भ्रष्टाचाराचे प्रकरण सतत वाढत आहेत. त्यामुळे भ्रष्टाचाराचा सुळसुळाट कधी थांबणार आणि भ्रष्टाचारी कर्मचारी यांना चोप कधी बसणार असे संतापजनक सवाल नागरिकांतून विचारले जात आहेत. त्यामध्ये असाच धक्कादायक प्रकार पोलीस खात्यातून समोर आला आहे.
महावितरणमधील वायरमनने घेतली २ लाखांची लाच – सविस्तर बातमी
गेल्या काही महिन्यात लाच लुचपत विभागाने अनेक जिल्ह्यात कारवाई करत बड्या अधिकाऱ्यांसह सरकारी नोकरदारांना रंगेहात पकडले आहे. आता असाच प्रकार बीडच्या नेकनूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचारी बळवंत याला १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. ही कारवाई नेकनूर पोलीस ठाण्याच्या परिसरात करण्यात आली. त्यामुळे जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अमलदार दत्तात्रय बळवंत हे नेहमीच वादग्रस्त राहिलेले कर्मचारी आहेत. पोलीस अंमलदार दत्तात्रय बळवंत यांनी, काही महिन्यांपूर्वी एका तरुणाला तुझे कॅरेक्टर खराब करून टाकेल, अशी धमकी दिल्याचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला होता. त्यानंतर, त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. आता, त्याच बळवंत महोदयांना लाच प्रकरणात अटक करण्यात आली आहे. एका प्रकरणातील काम करण्यासाठी संबंधित अंमलदाराने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर जालना एसीबीने पडताळणी करुन सापळा रचून बळवंत यांना रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक बाळासाहेब जाधवर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने नेकनूर पोलीस ठाण्याच्या परिसरात कारवाई केली. कारवाईनंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास एसीबीकडून करण्यात येत आहे.
काही महिन्यापूर्वी या पोलीस कर्मचाऱ्याने शेतकऱ्याला दिली होती धमकी
अटक करण्यात आलेला हा कर्मचारी यापूर्वीही वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. काही महिन्यांपूर्वी शेतीच्या कारणावरून झालेल्या वादात संबंधित अंमलदार एका व्यक्तीस “कॅरेक्टर खराब करून टाकीन” अशी धमकी देत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या घटनेनंतरही अंमलदाराच्या वर्तणुकीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. आता,पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्यामुळे पुन्हा एकदा बीड पोलीस दल पुन्हा चर्चेत आले आहे.























