लोणी काळभोर भागातील घटना
पुणे – कौटुंबिक वाद, तसेच चारित्र्याच्या संशयावरुन महिलेच्या डोक्यात पतीने दगड घालून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना लोणी काळभोर भागत घडली. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली.
तोतया महिला पोलीस उपनिरीक्षकाला पकडले – सविस्तर बातमी
या प्रकरणी शरद विठ्ठल वारे (वय ३७, रा. कदमवाक वस्ती, लोणी काळभोर, पुणे-सोलापूर रस्ता) याला अटक करण्यात आली. या घटनेत त्याची पत्नी शीतल (वय ३४) गंभीर जखमी झाली. याबाबत गोरख संजय वारे (वय ३२) याने लोणी काळभाेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आराेपी शरद याला दारुचे व्यसन आहे. कौटुंबिक वाद, तसेच व्यसनावरुन वारे दाम्पत्याात वाद व्हायचा. आरोपी शरद हा पत्नीच्या चारित्र्याचा संशय घ्यायचा. वादातून ५ जून रोजी रात्री शरद याने पत्नी शीतला हिला शिवीगाळ करुन मारहाण केली. तिच्या डोक्यात दगड घातल्याने ती गंभीर जखमी झाली. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.






















