मंच्युरियनमधून गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार

मंच्युरियनमधून गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचारकाम देण्याच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

अंबाजोगाईतील घटना; दोघांविरोधात गुन्हा दाखल

marathinews24.com

बीड : (अनंत जाधव) – जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे महाविद्यालयीन तरुणीवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आरोपींनी पीडितेला बदनामीची धमकी देत तब्बल ३ लाख रुपये रोख आणि साडेनऊ तोळे सोन्याचे दागिने उकळल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

पुण्यात त्या पार्टीत सहभागीना मिळणार समुपदेशनाचा डोस – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई येथे शिक्षणासाठी राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीची ओळख महेश करपे (रा. धारूर) व पवन कराड (रा. पांगरी, ता. परळी) या दोघांशी झाली होती. सुरुवातीला ओळखीचा फायदा घेत आरोपी तिचा पाठलाग केला. दरम्यान, महेश करपे याने तरुणीला खाद्य पदार्थातून (मन्चुरिन) मधून गुंगीचे औषध देऊन ती बेशुद्ध झाल्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर दुसऱ्या आरोपीनेही तरुणीला पुण्यातील लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यावेळी आरोपींनी संबंधित घटनेचे फोटो व व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच कुटुंबीयांना दाखवण्याची धमकी दिली.

भीतीचा फायदा घेत आरोपींनी पीडितेकडून वेळोवेळी रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने घेतल्याचे उघडकीस आले आहे. दिर्घकाळ मानसिक त्रास सहन केल्यानंतर पीडित तरुणीने अखेर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×