मद्य विक्री दुकानातील कामगाराला मारहाण

मद्य विक्री दुकानातील कामगाराला मारहाण

हप्त्याचीही केली मागणी

marathinews24.com

पुणे – मद्य विक्री दुकानातील कामगाराकडे हप्त्याची मागणी करुन मारहाण करणाऱ्या सराइताला लोहगाव पोलिसांनी अटक केली.
अतुल गौतम ढोकरे (वय २५, रा. कलवड वस्ती, लोहगाव) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत अमितकुमार लखन तिवारी (वय ३२, रा. लोहगाव) याने लोहगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मंच्युरियनमधून गुंगीचे औषध देऊन तरुणीवर अत्याचार – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिवारी हा लोहगावमधील साठे वस्ती परिसरात असलेल्या एका मद्य विक्री दुकानात कामाला आहे. आरोपी ढोकरे हा रिक्षाचालक असून, त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. ७ जून रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास ढोकरे आणि साथीदार मद्य विक्री दुकानात आले. दुकानातील कामगार तिवारी याच्याकडे त्यांनी दरमहा पाच हजार रुपये हप्ता देण्याची मागणी केली, तसेच आरोपींनी फुकट मद्याच्या बाटल्या देण्यास सांगितले. तिवारी याने नकार दिल्यानंतर आरोपींनी त्याला शिवीगाळ करुन मारहाण केली. आरोपी ढोकरे याने त्याला मोबाइल संच फेकून मारला. पसार झालेला आरोपी ढोकरे याला अटक करण्यात आली असून, साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक शिंदे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×