विश्रांतवाडीत ज्येष्ठ महिलेची सोनसाखळी हिसकावली

पुण्यात महिलांचे दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांचा उच्छाद

चोरट्याविरुद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शहरातील विविध भागात दुचाकीस्वार चोरट्यांनी धुडगूस घातला असून, पादचारी महिलांसह जेष्ठांना लक्ष्य करीत ऐवज हिसकावून नेला जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रस्त्याने पायी चाललेल्या जेष्ठ महिलेचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ५० हजारांची सोनसाखळी हिसकावून नेल्याची घटना ७ जूनला रात्री सव्वा आठच्या सुमारास विश्रांतवाडीत घडली आहे. निर्मला पितांबर हेमनानी (वय ६०, रा. सावित्री अपार्टमेंट, मुक्तांगण समोर, मोहनवाडी, येरवडा) यांनी तक्रार दिली आहे.

गुंड आंदेकर टोळीतील पसार सराईताला अटक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ महिला येरवडा परिसरातील सावित्री अपार्टमेंटमध्ये राहायला आहे. ७ जूनला रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास हेमनानी या त्यांच्या मैत्रिणीसोबत पाम गार्डन येथून सर्व्हिस रोडने घरी जात होत्या. त्यावेळी मेंटल कॉर्नर बस स्टॉप जवळील राधाकृष्ण हॉटेल परिसरात मागून दुचाकीवरून दोघा चोरट्यांनी त्यांना गाठले. दुचाकीवर मागे बसलेल्या चोरट्याने हेमनानी यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी हिसकावून नेली. दोघेही चोरटे दुचाकीवरून वेगाने पसार झाले. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले तपास करीत आहेत.

विमाननगरमध्ये तरुणाचा ऐवज चोरीला

झोपलेल्या तरूणाचा मोबाइलसह सोन्याचे दागिने असा मिळून ८० हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. ही घटना ७ जूनला मध्यरात्री तीनच्या सुमारास विमाननगरमधील इंप्रेस बिल्डींगमधील अ‍ॅलीस आईस्क्रीम पार्लरसमोर घडली आहे. याप्रकरणी संदीप कोटारू (वय ४०, रा. आंध्र प्रदेश) याने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मूळचे आंधप्रदेशातील असून, कामानिमित्त ते ७ जूनला विमाननगर रोडवरील इमारतीनजीक झोपले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांचा मोबाइल, सोन्याचे दागिने असा मिळून ८० हजारांचा ऐवज चोरून नेला. सकाळी झोपेतून उठल्यानंतर तक्रारदार संदीपला मोबाईलसह दागिने चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप पालवे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×