ग्रामपंचायत सदस्य आरक्षण सोडत १२ जून रोजी

तहसीलदार स्वप्नील रावडे यांची माहिती

marathinews34.com

बारामती – राज्य निवडणुक आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देश व मार्गदर्शक सूचनेप्रमाणे तालुक्यातील ५३ ग्रामंपचायतीमध्ये ग्रामपंचायत सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम १२ जून रोजी होणार आहे.

पुण्यात त्या पार्टीत सहभागीना मिळणार समुपदेशनाचा डोस – सविस्तर बातमी

राज्य निवडणूक आयोगाच्या २५ मे २०२६ रोजीच्या आरक्षण सोडतीबाबत मार्गदर्शक सूचना तसेच २६ मे २०२६ रोजीच्या निर्देशाप्रमाणे राज्यातील बिगर व अंशतः अनुसूचित क्षेत्रातील सन २०२४ व २०२५ मध्ये मुदत संपलेल्या व सन २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नवनिर्मित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी सदस्यांचा आरक्षण सोडत कार्यक्रम होणार आहे. या सोडत कार्यक्रमाकरिता ग्रामपंचायत निहाय अध्याक्षी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच गटविकास अधिकारी यांनी नियुक्त केलेले ग्रामपंचायत अधिकारी हे सहायक अध्याक्षी अधिकारी म्हणुन कामकाज पाहणार आहेत.

आरक्षण सोडती होणाऱ्या ग्रामपंचायती: खराडेवाडी, कन्हेरी, पाहुणेवाडी, झारगडवाडी, वाकी, वडगांव निंबाळकर, उंडवडी सुपे, तरडोली, सोनगाव, शिरसने, सांगवी, पिंपळी, निंबुत, नारोळी, मोढवे, मेखळी, माळवाडी लोणी, माळवाडी लाटे, कोऱ्हाळे बु, कटफळ, जैनकवाडी, जोगवडी, होळ, देऊळगाव रसाळ, बऱ्हाणपूर, मोराळवाडी आणि कोळोली या ग्रामपंचायतीमध्ये सकाळी १० वाजता तर ग्रामपंचायत मळद, वढाणे, सोनवडी सुपे, शिरवली, सावळ, निरावागाज, माळेगाव खुर्द, लाटे, खांडज, खंडोबाचीवाडी, थोपटेवाडी, कांबळेश्वर, कारखेल, जळगाव सुपे, सस्तेवाडी, सदोबचिवाडी, घाडगेवाडी, गोजुबावी, ढेकळवाडी, ढाकाळे, खामगळवाडी, चोपडज, बाबूर्डी, आंबी खुर्द, अंजनगाव आणि मुर्टी येथे दुपारी ३ वाजता आरक्षण सोडत कार्यक्रम होणार आहे, असे तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×