खडकी दारूगोळा कारखान्यातील स्फोटात कामगाराचा मृत्यू

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

खडकी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

marathinews24.com

पुणे – खडकीतील दारुगोळा कारखान्याच्या आवारात झालेल्या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा मंगळवारी ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. कार्तिक बर्मन (वय ३० रा ऑर्डनन्स इस्टेट, सर्व्हेंट क्वार्टर, खडकी) असे स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे.

विश्रांतवाडीत ज्येष्ठ महिलेची सोनसाखळी हिसकावली – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारूगोळा कारखान्याच्या आवारात ‘एफ-४ सेक्शन’ आहे. तेथे प्रसाधनगृह बांधण्याचे काम सुरू आहे. कार्तिक बर्मन सोमवारी दुपाारी तेथे काम करत होता. विटा, तसेच अन्य साहित्य त्याने बांधकामासाठी पुरविले. दुपारी तीनच्या सुमारास तो आवारातील एका खोलीच्या पायरीवर बसला होता. त्यावेळी तेथे एक वस्तू पडली होती. बर्मनने ही वस्तू उचलली. तेव्हा अचानक स्फोट झाला. स्फोटात त्याच्या हाताला दुखापत झाली.

स्फोट झाल्यानंतर कारखान्यातील कामगारांनी त्वरीत तेथे धाव घेतली. कारखान्यातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्याला तातडीने दारूगोळा कारखान्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी पहाटे उपचारादरम्यान बर्मनचा मृत्यू झाला. खडकी पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

दुर्घटनेची सखोल चौकशीची मागणी

‘कार्तिक बर्मन हा ठेकेदारी पद्धतीने काम करत होता. ‘एफ-४ सेक्शन’ भाग संवेदनशील आहे. या भागात तो काम करत होता. दारूगोळा कारखान्यात अनेक कामगार ठेकेदारी पद्धतीने काम करतात. ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या कामगाराला गंभीर दुखापत झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना दारुगोळा कारखान्यात काम करणाऱ्या कायमस्वरुपी कामगारांप्रमाणे नुकसान भरपाई मिळावी, तसेच या दुर्घटनेची सखोल चौकसी करण्यात यावी’, अशी मागणी ॲम्युनिशन फॅक्टरी वर्कर्स युनियनचे कार्याध्यक्ष, ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लाॅईज फेडरेशनचे कार्याध्यक्ष रवींद्र रेड्डी यांनी केली आहे. याबाबत दारुगोळा कारखान्यातील अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×