कोथरूड भागातील घटना
marathinews24.com
पुणे – दुचाकीची डिकी उचकटून दोन लाख रुपयांची रोकड चोरुन नेण्यात आल्याची घटना कोथरूड भागात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील वडगाव उड्डाणपुलावर मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सेवानिवृत्त आहेत. ते वारजे भागात राहायला आहेत. शुक्रवारी (२ मे) ते सकाळी सव्वाअकराच्या सुमारास पौड रस्त्यावरील एका बँकेत रोकड भरण्यासाठी आले होते. डिकीत एक लाख ९९ हजारांची राेकड होती. पौड रस्त्यावरील उमाशंकर प्रसाद कन्स्ट्रक्शनजवळ असलेल्या गल्लीत त्यांनी दुचाकी लावली. चोरट्यांनी दुचाकीची डिकी उचकटून रोकड चोरुन नेली. रोकड चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक बालाजी सानप तपास करत आहेत.