रियल इस्टेटमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने केली फसवणूक
marathinews24.com
पुणे – रिअल इस्टेटच्या व्यवसायात गुंतवणुक करण्याबाबत विश्वास संपादन करुन त्याबदल्यात चांगला परतावा देण्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी विंग कमांडरची ९० लाखांची फसवणुक केली आहे. याप्रकरणी अजय यादव, विशाल सेठ ( रा.काेंढवा,पुणे) यांचे विराेधात गुन्हा दाखल केला आहे. विंग कमांडर कलीम अली बेग (वय- ५२,रा. उंड्री,पुणे) यांनी काळेपडळ पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २०२१ पासून एप्रिल २०२४ कालावधीत घडली आहे.
पुणे : पीएमपीएल चालकाला पट्ट्याने मारहाण – सविस्तर बातमी
रिअल इस्टेट व्यवसायात गुंतवणुक करण्यासंदर्भात आरोपीने तक्रारदार यांच्याशी चर्चा केली. गुंतवणुक केल्यास त्यांना चांगला परतावा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे तक्रारदार यांनी आरोपीच्या ब्रान्डलान्स कंपनीच्या खात्यावर ९० लाख ७ हजार रुपये वेळाेवेळी पाठवले. पैसे हे कर्मा रिअलिटी यांचाकडे गुंतवणुक केल्याचे सांगत आरोपीने तक्रारदार यांच्याशी नाेटरी करारनामा केला. नाेटरी करारनाम्यात तक्रारदाराला पिसाेळीतील रिजाॅईस हाेम्स याठिकाणी प्लॅट सी ८०४ देण्याचे मान्य केले. परंतु १ वर्षानंतर तक्रारदार यांनी आराेपींकडे केलेल्या गुंतवणुकवर फायदा व मुळ रक्कम मागणी करत विचारणा केली. त्यावेळी आराेपींनी रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याने तक्रारदार यांनी कर्मा रिअँलटी लेटर पॅडवरील पत्र व नाेटरी करारनामा बाबत माहिती घेतली असता, लेटरपॅड व साईन व शिक्का बनावट असल्याचे उघड झाले. करारनाम्यात असणारा ३ बीएचके सदानिका ही कर्मा रिअँलिटी यांनी दिलेली नाही. सदानिका नंबर हा रिफ्युजी एरिया असल्याचे तक्रारदार यांना समजले विश्वास संपादन करुन सदर रकमेची फसवणुक केल्याने त्यांनी काळेपडळ पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
टास्क बहाण्याने गंडा
खडकी येथे रहाणाऱ्या साेनु कुमार पलटुराम (वय ३२) यांना सायबर चाेरटयांनी संर्पक करुन व्हाॅटसअपद्वारे नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवले. इतरांना कमी वेळेत कशाप्रकारे नफा मिळत आहे, असे भासवून गुंतवणुक करण्यास सांगत १ लाख ८१ हजार रुपयांची गुंतवणुक घेऊन फसवणूक केली. याबाबत खडकी पाेलीस ठाण्यात अज्ञात आराेपींवर गुन्हा दाखल केला आहे.