राजस्थानातील तरुण अटकेत
marathinews24.com
पुणे – कोंढवा परिसरात मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या तस्कराला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले आहे. त्याच्याकडून पावणेदहा लाखांचे मेफेड्राेन, मोबाइल , दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.।दिनेश मानाराम देवासी (वय १९, रा. घोरपडी, मूळ रा. राजस्थान) असे अटक लेलेल्याचे नाव आहे. देवासी याच्याविरुद्ध अमली पदार्थ विक्री प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस हवालदार विशाल दळवी यांनी फिर्याद दिली आहे.
दिल्लीतुन सीबीआय अधिकारी बोलत असल्याची केली बतावणी अन घातला गंडा – सविस्तर बातमी
लुल्लानगरमध्ये हुक्का पार्लरवर छापा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवासी मेफेड्रोन विक्री करण्यासाठी आल्याची माहिती पोलीस कर्मचारी विशाल दळवी यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून ४४ ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या मेफेड्रोनची किंमत पावणेदहा लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, एसीपी गणेश इंगळे, एसीपी राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे.
राज्य शासनाने हुक्का पार्लरवर बंदी घातली असताना कोंढव्यातील लुल्लानगर भागात बेकायदा हुक्का पार्लर सुरू असल्याचे उघडकीस आले. पोलिसांच्या पथकाने हुक्का पार्लरवर छापा टाकला. याप्रकरणी मुशीर बशीर शेख (वय ४८, रा. चाचा हलवाई चौक, नाना पेठ), नवल अनिल अहिर (वय ३४, रा. कोंढवा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.