Breking News
पुण्यात भरधाव कारची दोन विद्यार्थिनी धडकगोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह

वादातून भावावर केला कुर्‍हाडीने हल्ला, बिबवेवाडीतल घटना

आरोपीविरूद्ध बिबवेवाडी पोलिसांनी दाखल केला गुन्हा 

marathinews24.com

पुणे – किरकोळ वादातून भावावर कुर्‍हाडीने हल्ला करून गंभीररित्या जखमी केल्याची घटना १४ मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास बिबवेवाडीतील पापाळवाड्यात घडली आहे. याप्रकरणी आरोपीविरूद्ध बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नितीन पंढरीनाथ पापळ (वय ५०, रा. पापळवाडा, बिबवेवाडी ) असे गंभीर जखमीचे नाव आहे. याप्रकरणी मनोहर पंढरीनाथ पापळ (वय ४५) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अश्विनी पापळ (वय ३७ रा. बिबवेवाडी) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह चौघांवर गुन्हा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पापळ कुटूंबिय बिबवेवाडीत राहायला असून, नितीन आणि पंढरीनाथ भावडांमध्ये किरकोळ वादावादी झाली होती. त्याच रागातून १४ मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास लहान भाउ मनोहरने नितीनला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तुझ्यात दम असेल तर तू खाली ये, असे म्हणत त्यांना धमकाविले. त्यामुळे नितीन खाली गेला असता, आरोपी मनोहरने त्याच्यावर कुर्‍हाडीने हल्ला चढविला. त्यांच्या डोक्यात, खांद्यावर, डोळ्यावर वार करून आरोपीने जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शशांक जाधव तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×