Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यू

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

रस्ता ओलांडताना वाहनाची धडक; उपचारांपूर्वीच तरुणाचा मृत्यू

marathinews24.com

पुणे – हडपसर-सासवड रस्त्यावर वाहनाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी चारचाकी वाहन चालकाविरुद्ध गु्न्हा दाखल केला. तपसी जगदीश पासवान (वय ३८, रा. वडकी नाला, सासवड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याबाबत पासवान याची पत्नी अमृतादेवी (वय २८) हिने फुरसुंगी पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

औषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपसी पासवान मजुरी करतो. तो पत्नीसह वडकी नाला भागात राहायला आहे. तो २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हडपसर सासवड रस्त्यावरील वडकी नाला भागातून निघाला होता. त्या वेळी भरधाव चारचाकी वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या पासवानला धडक दिली. अपघातात तो गंभीर जखमी झाला. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.अपघातानंतर पसार झालेल्या वाहन चालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक शंभुराज जाधव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×