Breking News
आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखा-ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामलेआमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्ह्याच्या मागणीसाठी रोहित पवारांचा कोथरूड ठाण्यात ठिय्याधर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता संस्थेची ५० कोटींची जमीन तारणदिशाहीन नियोजन व एफएसआय’च्या अनिर्बंध अतार्किक मंजुऱ्यां मुळे ‘पुणे वाहतुक कोंडीच्या’ संकटात…!भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलतजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली चाकण एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्नएमडी विक्रीच्या तयारीतील त्रिकुटाला बेड्यागणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदमपुण्यातील सराईतांना दणका, २२ जण तडीपारपुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन सराईत तडीपार

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य

डेक्कन पोलिसांकडून दोघाविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणारी चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी डेक्कन पोलिसांकडून दोघाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सुनील पांडे (वय ५६, रा. भांडारकर रस्ता, डेक्कन जिमखाना) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी संतोष पंडीत याच्यासह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेफेड्रोन विक्री प्रकरणात तिघे अटकेत – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी ‘राजकारण एक्सप्रेस’ या समाज माध्यमातील खात्यावर चंद्रकांत पाटील यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणारी चित्रफीत नुकतीच प्रसारित केले. ‘ जनतेच्या प्रश्नाची उत्तरे नेते देत नाहीत. पाटील हे त्यापैकी एक आहेत’, असा मजकूर असलेली चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित केली. या चित्रफितीत अवमानकारक वक्तव्य असल्याचे निदर्शनास आल्यानंतर नगरसेवक पांडे यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली.

अश्लील, शिवराळ भाषा चित्रफितीत आहे. या चित्रफितीत अवमानकारक वक्तव्य करण्यात आले आहे, असे पांडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. भारतीय न्याय संहिता कलम ३५६, २९६, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×