महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा
marathinews24.com
पुणे – शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने महिलेसह १६ जणांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांकडून महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी ही बनवाबनवी, थेट शैक्षणिक संस्थेची मिळकत हडप करण्याचा डाव उघडकीस – सविस्तर बातमी
प्रभाकर मधुकर नेहेते (वय ६१, रा. साद अपार्टमेंट, मानाजीनगर, नऱ्हे), शीतल काळे (वय ४०, रा. ,शिवा हाईट्स, पिंपळे सौदागर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एका महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला भवानी पेठेत राहायला आहेत. आरोपी नेहेते आणि काळे यांच्याशी महिलेची ओळख झाली होती. त्या वेळी आरोपींनी शेअर बाजारात दलाल असल्याची माहिती महिलेला दिली होती. आरोपींनी महिलेला शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखविले होते. महिलेने सुरुवातील काही रक्कम आरोपींना गुंतवणुकीस दिली. त्यानंतर महिलेच्या ओळखीतील १६ जणांनी आरोपींकडे रक्कम गुंतविण्यास दिली. त्यांनी एकूण मिळून दोन लाख ७९ हजार रुपये रक्कम गुंतवणुकीस दिली.
गुंतवणुकीवर परतावा देण्याचे आमिष आरोपींनी त्यांना दाखविले होते. रक्कम गुंतविल्यानंतर त्यांनी परतावा दिला नाही. परताव्याबाबत विचारणा केली. तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.