घरकाम करणाऱ्या महिलेने तब्बल ४ लाखाचे दागिने चोरले
पुणे- घरकामास ठेवलेल्या महिलेकडून चार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेण्यात आल्याची घटना पर्वती परिसरातील मित्रमंडळ काॅलनीत घडली. याप्रकरणी महिलेसह तिच्या मुलीविरुद्ध पर्वती पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, घरकामास ठेवलेल्या महिलेसह तिच्या मुलीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने १६ जणांची फसवणूक -सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मित्रमंडळ काॅलनीत राहायला आहेत. महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून त्यांनी वेळोवेळी चार लाख १५ हजार रुपयांचे दागिने चोरुन नेले. दागिने चोरीचा प्रकार नुकताच उघडकीस आला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार मरगजे तपास करत आहेत.