Breking News
वै. हरिभक्त परायण सखाराम महाराज तडस निर्व्यसनी ग्रुप तर्फे आषाढी एकादशीनिमित्त घाटी रुग्णालय व अनाथ आश्रमात फराळ वाटपसस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हजतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात १०२ पिशव्यांचे संकलनदिवसा रेकी करून रात्री घरफोडी करणाऱ्या टोळीचा एलसीबीने केला पर्दाफाशमाहिती-तंत्रज्ञान कंपनीत नोकरीच्या आमिषाने फसवणूकपुण्यात अल्पवयीनावर गाेळीबार करणारा गुंड अटकेतपुण्यात प्रेम प्रकरणातून अल्पवयीनाचा खूनशहरात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यूगुंतवणुकदारांची ८८ कोंटींची फसवणूक; पसार झालेल्या आरोपीचे प्रत्यार्पणआरोग्यवारी अल्ट्राग्रुप रन-२०२६ निमित्त २६ जुलै रोजी पुणे–जेजुरी–बारामती मार्गावरील वाहतुकीत बदलपुण्यात एकाच दिवशी दोन ठिकाणी गोळीबार

पुण्यात एकाच दिवशी दोन ठिकाणी गोळीबार

मोबाइल गेम खेळताना बाळगलेल्या पिस्तुलातून गोळीबार- तरुण जखमी

 घोरपडे पेठ, पीएमसी वसाहतीत गोळीबार

marathinews24.com

पुणे – शहरात दोन ठिकाणी गोळीबार करण्यात आल्याच्या घटना घडल्या. खडक पोलीस ठााण्याच्या हद्दीतील घोरपडे पेठ पोलीस चौकीसमोर दोघांवर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. गोळीबारात एक तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्याबरोबर असलेला एक जण पळाल्याने बचावला. गाोळीबाराच्या घटनेनंतर पसार झालेल्या एकाला ताब्यात घेण्यात आले. पोलीस चौकीसमोर गोळीबाराची घटना ताजी असतानाच शुक्रवारी सायंकाळी खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महापालिका वसाहतीत गोळीबाराची घटना घडली.

खाकीचा सर्जिकल स्ट्राईक; स्कॉर्पिओतून चोऱ्यांचा थरार रचणारी टोळी गजाआड – सविस्तर बातमी

ख्वाजाउद्दीन नजीर शेख उर्फ नूर शेख (वय २९) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सुजल सुनील परदेशी (वय २२), सोनू उर्फमाँटू अनिल परदेशी (वय २७), जय अनिल परदेशी (वय २५), नितेश रिकब (वय २२, सर्व रा. काशेवाडी, भवानी पेठ) यांना रात्री उशीरा अटक करण्यात आली. आरोपींबरोबर असलेल्या दोन साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे. प्राथमिक चौकशीत वैमनस्यातून शेख याच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती खढक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नूर शेख याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. शेख याच्या काकाने आरोपी सोनू उर्फ माँटू परदेशी याचे वडील अनिल परदेशी यांचा २००५ मध्ये खून केला होता. शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास शेख आणि त्याचा मित्र घोरपडे पेठेतील मोमीनपुरा परिसरात आला होता. घोरपडे पेठ पाेलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अनुसया टाॅवरसमोर ते थांबले होते. त्या वेळी दुचाकीवरुन आरोपी तेथे आले. आरोपी सोनू परदेशी याने शेख याच्यावर पिस्तूल रोखले. तुझ्या नातेवाईकांनी माझ्या वडिलांचा खून केला होता. आम्ही तुला मारुन टाकणार आहोत, अशी धमकी देऊन पिस्तुलातून शेख याच्यावर एकापाठोपाठ तीन गोळ्या झाडल्या. त्या पैकी गोळी नूर याच्या पाठीत शिरल्याने तो गंभीर जखमी झाला. गजबजलेल्या घोरपडे पेठ परिसरात गोळीबार झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात घबराट उडाली.

घटनेची माहिती मिळताच खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली. गंंभीर जखमी झालेल्या नूर याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोळीबार करुन पसार झालेल्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

पीएमसी काॅलनीत गोळीबार

घोरपडे पेठ पोलीस चैाकीपासून शुक्रवारी सकाळी तरुणावर गोळीबार झाल्याची घटना घडली. त्यानंतर तेथून काही अंतरावर असलेल्या पीएमसी काॅलनी क्रमांक नऊच्या परिसरात शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गाेळीबार करण्यात आल्याची घटना घडली. गोळीबार करणारे आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली आहे. ज्याच्यावर गोळीबार करण्यात आला. तो अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सुदैवाने या घटनेत काेणी जखमी झाले नाही. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले, सहायक आयुक्त सचिन हिरे, खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×